शाहरुखही वेबसीरिजच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • ‘मनी हाईस्ट’ वेबसीरिजवर शाहरूख चित्रपट बनवणार
  • ‘रेड चिलीज एंटरटेन्मेंट’ कंपनीने अधिकृत हक्क विकत घेतले
  • वेबसीरिज एक स्पॅनिश थ्रिलर

‘झिरो’ चित्रपट सुपरफ्लॉप झाल्यानंतर शाहरूख खानने एकही चित्रपट साईन केला नाही. आता तो वेबसीरिजवर आधारित चित्रपट घेऊन येत आहे. नेटफ्लिक्‍सवर प्रदर्शित होणारी ‘मनी हाईस्ट’ या वेबसीरिजवर शाहरूख चित्रपट बनवणार आहे.

शाहरूखच्या ‘रेड चिलीज एंटरटेन्मेंट’ कंपनीने या वेबसीरिजचे अधिकृत हक्क विकत घेतले आहेत. ही वेबसीरिज एक स्पॅनिश थ्रिलर वेबसीरिज आहे. या सीरिजचा तिसरा भाग लवकरच नेटफ्लिक्‍सवर प्रदर्शित होणार आहे.

शाहरूखला या वेबसीरिजची कथा आवडली असल्याने याचे रूपांतर चित्रपटात करण्याचा त्याने निर्णय घेतला. शिवाय या चित्रपटाच्या कथेवर काम करण्यासाठी शाहरूखने एका विशेष टीमची नेमणूकही केली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News