शाहिद कपुरच्या हिट कबीर सिंगने तोडला या चित्रपटांचा रेकॉर्ड ! 

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Monday, 8 July 2019

नुकताच रिलीज झालेला सलमानचा भारत हा सिनेमा असो किंवा रणवीर सिंगचा गली बॉय, विकी कौशलचा उरी, वरूण धवनच्या कलंकलाही शाहिदच्या कबिर सिंग या चित्रपटाने सर्वच चित्रपटांना मागे टाकलय. 

मुंबई  : शाहिद कपुरच्या कबिर सिंग या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकुल घालत आहे. या वर्षि रिलीज झालेला हा सिनेमा रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. कबिर सिंग हा चित्रपट रिलीज होताच प्रेक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद बघायला मिळत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत सर्वच चित्रपटांना मागे टाकले आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने भल्या मोठ्या स्टार्सलाही मागे टाकल आहे. नुकताच रिलीज झालेला सलमानचा भारत हा सिनेमा असो किंवा रणवीर सिंगचा गली बॉय, विकी कौशलचा उरी, वरूण धवनच्या कलंकलाही शाहिदच्या कबिर सिंग या चित्रपटाने सर्वच चित्रपटांना मागे टाकलय. 

भारतातच नाही तर हा सिनेमा ऑस्ट्रेलियन बॉक्स ऑफिसवर या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे, तरण आदर्श यांच्या मते कबीर सिंगने ऑस्ट्रेलियामध्ये ९५९,९९४ ऑस्ट्रेलियन डॉलरची कमाई केली आहे. या कमाईनंतर हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. 

या चित्रपटाने रिलीजच्या १७ दिवसानंतरही २२६.११ कोटीहून अधिक कमाई केली आहे. अजूनही बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा दमदार कमाई करत आहे. अजुन किती दिवस हा सिनेमा बॉक्सॉफिसवर कमाई करणार हे  आता पाहायला मिळणार आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News