ध्येय निश्चीत करुन स्वत:शी प्रमाणिक राहुन अभ्यास करा, यश मिळणारच

जालिंदर धांडे
Saturday, 27 July 2019

नागरे पाटील यांना पहिले व त्यांचे विचार आत्मसात करत, त्यांच्या सारखेच अधिकारी व्होण्याची इच्छा व्यक्त करत, त्या मार्गाने यशस्वी वाटचाल सुरु केली व ते सत्यात सुद्धा उतरवले, त्यामुळे विजय कबाडे यांचे आयडॉल हे विश्वास नागरे पाटील आहेत. 

लातुर येथील रहिवासी असलेले विजय व्यंकटराव कबाडे यांचे वडील सर्व साधारण कुटूबांतील असुन सुरुवातील कृषि दुकानाचा व्यवसाय केल्यानंतर सध्या शेतात काम करत आहेत. दोन मोठ्या बहिणी व एक छोटा भाऊ असलेले विजय कबाडे लहान पणापासुन मनात अधिकारी होण्याची जिद्दी पाळुन होते. त्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विश्वास नागरे पाटील यांचे लातुर येथील शाहु महाविद्यालयात व्याख्यान झाले, त्या व्याख्यानामुळे प्रभावित होऊन, कबाडे यांनाची अधिकारी होण्याची जिद्दी अधिकच घट्ट झाली.

यामुळे एमपीएससीचा अभ्यास क्रम सुरु केला व २००७ मध्ये एमपीएससी परिक्षेतुन नायब तहसिदारची पहिल्या प्रयत्नात पोस्ट मिळवली. यानंतर २००९ मध्ये दुसरा प्रयत्नात राज्यातुन सातवा क्रमांक मिळवत पोलीस उपअधीक्षक पदाला घवसणी घातली. सर्व सामान्य कुटूंबितुन येत ध्येय निश्चीत करुन, त्या मार्गावर प्रमाणिक पणे चालत विजय कबाडे यांनी अपर पोलीस अधीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. 

ध्येय निश्चित करुन मार्गक्रम व्हा
प्रत्येकाच्या जिवनात असंख्य संकटे व अडथळे येत असतात. परंतु या सर्व संकटावर मात करुन जे जिद्दीच्या व कठोर महेनतीच्या बळावर मार्गक्रम होत असतो, त्यांना जिवनात कधीच अपयश येत नसते, याचे उदाहरण म्हणजे लातुर येथील राहवाशी विजय व्यंकटराव कबाडे, घरची परस्थिती मध्यमवर्गी वडील कृषिचा व्यवसाय करुन घर चालवत. परंतु विजय कबाडे यांना लहानपणापासुन मोठे अधिकारी होण्याची इच्छा होती, यामुळे त्यांनी सुरुवातीपासुन शिक्षणावर जास्त भर दिला होता.

दहावी, बारावी झाल्यानंतर त्यांनी बी. कॉम, एल.एल.बी व एम.बी.एचे शिक्षण पुर्ण केले. यानंतर एमपीएससीचा प्रवास सुरु केला. यानंतर दुसरच्या प्रयत्नात त्यांनी पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली. ध्येय निश्चीत असेल व त्या मार्गाने चालत असताना कितीही महेनत करायाच तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळते. हे विजय कबाडे यांच्या प्रवाशातुन दिसुन येते. 

नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रातील ट्रेनिंग महत्वाची
नाशिक येथील पोलीस ॲकॅडमी मध्ये शारिरीक मानसीक जडणघडण यासह अधिकारी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी याठिकाणी करुन घेतल्या जातात. एक वर्ष भर चालणारी हे प्रशिक्षण खुप अवघड असते. परंतु या एक वर्षाच्या काळात अधिकारी होण्याच्या सर्वच गोष्टी मजबुत होतात. याचा फायदा अधिकारी म्हणुन काम करताना मोठ्या प्रमाणात होतो. 

या महत्वांच्या प्रश्नांना दिले महत्व
नाशिक येथील एक वर्षाचे प्रशिक्षण संपल्यानंतर एक जानेवारी २०११ मध्ये पोलीस उपअधीक्षक महणुन रुजु, या दरम्यान वाशिम, नांदेड, अहमदपुर (लातुर), बार्शी (सोलापुर) याठिकाणी दहशदवाद विरोधी कारवाया, स्त्रीभुणहत्या विरोधी कारवाया, गुंडगिरीवर प्रभावी नियंत्रण, अट्टल गुन्हेगारांवर मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करुन गुन्हेगारीला आळा बसलवला. 
 

अंधश्रध्दा विरोधी कायद्यानुसार महाराष्ट्रातील पहिली कारवाई नांदेड येथे केली. सध्या बीड येथे मार्च २०१९ पासुन अपर पोलीस अधीक्षक म्हणुन कार्यरत असुन येथे सुद्धा युवती महिलांच्या व इतर प्रश्नांवर चांगल्या प्रकारे काम सुरु आहे. आतापर्यंत ४५ वेळा वेगवेगळ्या कामगिरींसाठी विजय कबाडे, अपर पोलस अधीक्षक यांना खात्यांतर्गत प्रशंसा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

विश्वास नागरे पाटील आयडॉल
लातुर येथील शाहु महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, २००२ मध्ये विश्वास नागरे पाटील यांचे व्याख्यास आयोजित करण्यात आले होते. यावेळी विजय कबाडे यांनी पहिली वेळेस विश्वास नागरे पाटील यांना पहिले व त्यांचे विचार आत्मसात करत, त्यांच्या सारखेच अधिकारी व्होण्याची इच्छा व्यक्त करत, त्या मार्गाने यशस्वी वाटचाल सुरु केली व ते सत्यात सुद्धा उतरवले, त्यामुळे विजय कबाडे यांचे आयडॉल हे विश्वास नागरे पाटील आहेत. 

ध्येय निश्चित करुन मार्गक्रम करा
सध्या धावपळीच्या जिवनात विविध समस्यांमुळे अनेक वेळा निराशाच्या सामना करावा लागतो, परंतु सुरुवाती पासुन नेमके आपल्याला काय हवे आहे. हे ठरवले तर सर्व काही सोपो होऊन जाते. यामुळे सुरुवातील सर्व प्रथम आपल्याला काय व्हायचे आहे. ते ठरवा व त्या मार्गावर प्रामाणिक पणे चाला. दिवसातील कही घंटे अभ्यास केला याला, महत्व नसुन केलेल्या अभ्यासात किती प्रमाणिकपणे अभ्यास केला यांच्यावर आपले यश अवलंबुन असते. यामुळे जेवढा अभ्यास प्रमाणिकपणे कराला, त्यावर तुमचे यश अवलंबुन आहे. 

 

  • -१० वी उत्तीर्ण : १९९६
  • -१२ वी उत्तीर्ण : १९९८
  • -बी कॉम, एल एल बी, एम बी ए शिक्षण लातुर येथे पुर्ण केले
  • -२००७ च्या पहिल्या पर्यंनात नायबतहसीलदार; तीन वर हा पदभार संभाळला
  • -२००९ च्या दुसऱ्या पर्यंनात राज्यातुन सातवी रँक घेत पोलीस उपअधिक्षक पदाला गवसणी
  • -२०१९ पासुन बीड येथे अपर पोलिस अधिक्षक पदावर पदोन्नतीने रुजू
  • -सर्व सामान्य कुटूबातील असुन सुद्धा जिद्दीच्या बळावर गाटले यशाचे शिखर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News