सलमान खानने 'दंबग 3' च्या सेटवर "या" कारणामुळे बंद केले सर्वांचे स्मार्टफोन

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Thursday, 8 August 2019
  • सलमान खानच्या   'दंबग 3' च्या सेटवर बंद केले सर्वांचे स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे या मागचं कारण

मुंबई :  सलमान खान त्याच्या आगामी  'दंबग 3' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात सलमान सोबत सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार असून, महेश मांजरेकरांची मुलगी साई मांजरेकर सुध्दा या चित्रपटात दिसुन येणार आहे. त्यामुळे सलमानने चित्रपटाच्या सेटवर  सर्वांचेचं स्मार्टफोन बंद केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

HUD HUD Dabangg song done for #dabangg3.... @arbaazkhanofficial @prabhudheva @nikhildwivedi25 @skfilmsofficial

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सुत्रांच्या माहितीनुसार साई मांजरेकर सलमान सोबत फ्लॅशबॅक सिन्समध्ये रोमान्स करताना दिसुन येणार आहे. सलमानला साईबाबत चिपटातील सेटवरील कोणतीही माहिती व्हायरल होऊ द्यायची नाही. त्यामुळे सलमानने सेटवरील स्मार्टफोन बंद केले आहेत. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Day1.... #dabangg3 @arbaazkhanofficial @prabhudheva @nikhildwivedi25

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सेटवरील सर्व  मेहनत साईच्या लुकला लपवण्यासाठी केली जातं आहे. तसेचं पब्लिक प्लेसवर साईचे फोटो क्लिक केले जातीलं त्यामुळे तिला कुठेही बाहेर न जाण्याचं सांगण्यात आलं आहे. सलमान सर्वात पहिले स्वत: साईच्या लूकला सोशल मीडियावर शेअर करणार आहे. त्यामुळे सलमानसोबत चित्रपटाचे निर्माते देखील साईच्या लूकबाबत  सावधगिरी बाळगताना दिसुन येतायेत. हा चित्रपट येत्या 20 डिसेंबर 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News