सेनेत प्रवेश करणाऱ्या रामराजेंना धक्का, भाजपने आखली नवी खेळी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

मुंबई :राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेत जाण्याच्या चर्चा रंगत आहेत. अशातच रामराजेंना धक्का बसला आहे. कारण भाजपकडून रामराजे यांच्याविरोधात विधानपरिषदेत अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता आहे. 

भाजपने अविश्वास ठराव मांडल्यास रामराजे अडचणीत येणार हे नक्की. कारण स्थानिक स्वराज्या संस्थांतील पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचं संख्याबळ घटलं आहे. अशावेळी रामराजे यांना विधानपरिषद सभापती म्हणून आपलं पद कायम राखणं कठीण होऊ शकतं.

राज्य सरकारकडून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बजेट सादर करण्यात आलं. यावेळी अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप करत विरोधकांनी गोंधळ घातला. यात विधानपरिषदेत रामराजे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांत दुजाभाव केल्याचा आरोप भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आला. तसंच रामराजेंविरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबतही भाष्य केलं.

साताऱ्यात रामराजे आणि उदयनराजे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र या संघर्षानं टोक गाठल्याचं दिसत आहे. दोन्ही राजेंनी एकमेकांवर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली आहे. याच संघर्षामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला असल्याची माहिती आहे. तसंच आगामी काळात रामराजे शिवसेनेचं शिवबंधन बांधण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News