वारी जिथून सुरू होते, तेथून सुरू होतेय यांच्याकडून वारकऱ्यांची सेवा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे मॅक्‍झीन चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले.

भोसरी - संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे मॅक्‍झीन चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. परिसरातील राजकीय, सामाजिक संस्था, मंडळांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांना नाश्‍ता, उपवासाचे पदार्थ, पाणी, चहा, चप्पलदुरुस्ती, आरोग्यतपासणी, वैद्यकीय उपचार अशा विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येत होत्या.

महेशदादा स्पोर्टस फाउंडेशनद्वारेही वारकऱ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी आमदार महेश लांडगेंसह कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार विलास लांडे व नव महाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांना रेनकोटसह पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी संजय वाबळे, विराज लांडे, उमेश चव्हाण उपस्थित होते. 

वसंतराव लोंढे प्रतिष्ठानच्या वतीने दिंडीप्रमुखांना विठ्ठलाची मूर्ती देऊन सन्मानित केले, तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक वसंत लोंढे, प्रवीण लोंढे, कमलाकर काथमोडे उपस्थित होते. भाजप युवा मोर्चाच्या वतीने वारकऱ्यांना पाण्याबरोबरच उपवासाचे राजगिरा लाडू, बिस्कीट, केळीचे वाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक रवी लांडगे, भरत लांडगे, संतोष लांडगे उपस्थित होते. संत ज्ञानेश्‍वर मित्रमंडळ व गणेश तरुण मंडळ यांच्या वतीने लाडूंचे वाटप करण्यात आले.

या वेळी लक्ष्मण गवळी, नगरसेवक सागर गवळी, बापूसाहेब काचोळे उपस्थित होते. छावा प्रतिष्ठानच्या वतीने केळी, बिस्किटे वाटप करण्यात आले. जालिंदर शिंदे, कैलाश फुगे, विजय शिंदे उपस्थित होते. 

पुण्यश्‍लोक फाउंडेशनच्या वतीने मोफत वैद्यकीय तपासणी करून औषधवाटप करण्यात आले. डॉ. सत्यवान गडदे, डॉ. धनराज सोळुंकर, डॉ. अश्‍विनी सोळुंकर यांनी तपासणी केली. धनंजय तानले, राजेंद्र गाडेकर, भुजंग दुधाळे उपस्थित होते. लायन्स क्‍लब ऑफ भोजापूर गोल्ड 
आणि शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेद्वारे फराळासह फळवाटप करण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News