"या" गंभीर विषाणूने पुन्हा डोके वर काढले; २३ वर्षीय तरुणाला लागण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

केरळ : गेल्यावर्षी केरळमध्ये आढळलेल्या निपाह विषाणूने पुन्हा आपले डोके वर काढले आहे. केरळमधील २३ वर्षीय तरुण विद्यार्थ्याला या विषाणूची लागण झाली आहे. याबाबत पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) देखील याची पुष्टी केली आहे. सध्या या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. केरळ राज्याच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांनी मंगळवारी याला दुजोरा दिला आहे. 

दरम्यान याबाबत सोशल मीडियावर कोणतीही अफवा न पसरविण्याचे आवाहन शैलेजा यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. सरकारकडून हा विषाणू अधिक पसरू नये, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. आरोग्य विभाग परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तयार आहे. या रोगाचा सामना करण्यासाठी एर्नाकुलम मेडिकल कॉलेजमध्ये विशेष वाॅर्ड उपलब्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबियांसह त्यांच्या संपर्कात असलेल्या ८६ लोकांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

काय आहे निपाह विषाणू?

  • हा मनुष्य आणि प्राण्यांमध्ये संक्रमित होणारा विषाणू आहे.
  • १९९८ मध्ये मलेशियात कांपुंग सुंगई येथे तो प्रथम पसरला होता.
  • बहुतेक डुक्करांमध्ये याचा प्रभाव दिसून येतो.
  • हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे जातो.
  • यात लोकांना श्वासोच्छवासाची समस्या होते.

काय आहे याची लक्षणे

  • हा मनुष्य आणि प्राण्यांमध्ये संक्रमित होणारा विषाणू आहे.
  • मनुष्यांमध्ये निफाह विषाणूमुळे मेंदुला सूज येते.
  • ताप, डोकेदुखी, चक्कर येणे, मानसिक भ्रम होतो.
  • रुग्णाला श्वसन समस्या देखील येऊ शकते.
  • उलट्या होणे, कोमा
     
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News