मराठी भाषेचा गोडवा सांगणार ही मालिका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019
  • मराठी भाषेचा गोडवा तसंच मराठी भाषेचं जतन कशा प्रकारे केलं पाहिजे, हे एका मराठी मालिकेमधून सांगण्यात येणार आहे.
  • ‘झी युवा’ वाहिनीवर ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही नवी मालिका १५ जुलैपासून सुरू होणार आहे.

मराठी भाषेचा गोडवा तसंच मराठी भाषेचं जतन कशा प्रकारे केलं पाहिजे, हे एका मराठी मालिकेमधून सांगण्यात येणार आहे. ‘झी युवा’ वाहिनीवर ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही नवी मालिका १५ जुलैपासून सुरू होणार आहे.

या मालिकेच्या निमित्ताने दोन नवे चेहरे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यातीलच एक चेहरा म्हणजे अभिनेत्री गौरी कुलकर्णी. गौरीची ही पहिलीच मालिका आहे. आणि या मालिकेत ती सई हे पात्र साकारत आहे.

अगदी साधी-सरळ, मनमिळाऊ आणि सोज्वळ असे गौरीचे पात्र आहे. शिवाय मराठी भाषा, संस्कृती, परंपरा यांचे दर्शन घडवणारी मालिका गौरीला करायला मिळाल्याने ती फारच खूश आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News