"या" चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये इशान मुख्य भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

‘इश्‍क विश्‍क’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये इशान मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

अभिनेता इशान खत्तर ‘इश्‍क विश्‍क’च्या सिक्वेलमधून लवकरच प्रेक्षकांना भेटणार आहे. २००३ साली प्रदर्शित झालेला अभिनेता शाहिद कपूरचा पहिला चित्रपट ‘इश्‍क विश्‍क.’

या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये इशान मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट टीनएजवर आधारित आहे. सध्या या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरू आहे. या चित्रपटाची निर्मिती रमेश तुरानी करणार आहेत.

पहिल्या भागात शाहिदसोबत अभिनेत्री अमृता राव आणि शेहनाझ ट्रेजरी हे मुख्य भूमिकेत होते. सिक्वेलमध्ये इशानासोबत अजून कोणती अभिनेत्री झळकणार हे अद्याप समोर आलेले नाही. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News