भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंची भेट नेमकी कशासाठी ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही राजकीय स्वरुपाची भेट नसून सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या 18 खासदारांनी अयोध्येमध्ये जावून रामलल्लाचे दर्शन घेतले. यानंतर मुंबईमध्ये परतल्यावर सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

दरम्यान, राम मंदिरांच्या ज्या जागेचा वाद नाही त्या जागेवर मंदिर बनवण्यास सुरुवात करावी, न्यायालयात जो बाकी जागेबाबत निर्णय होईल त्यावेळी त्या जागेचा निर्णय घेतला जाईल. भाजप सरकारला आणि मोदींना कोणीतरी चुकीचा सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बरोबर इतर घटक पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करून पंतप्रधानांची लवकरच भेट घेत राम मंदिर उभारणी बाबत चर्चा करू. अशी चर्चा दोघांमध्ये झाल्याचे समोर आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News