शिवसेनेला शेतकऱ्यांची काळजी? पिकविम्यासाठी मुंबई 'बंद' करणार

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Sunday, 14 July 2019

पीककर्जात शेतकऱ्यांना नाडणाऱ्या विमा कंपन्यांना शिवसेना धडा शिकवणार असल्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर आता बुधवार (ता. 17) च्या मोर्चाचे जंगी आयोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे.

पीककर्जात शेतकऱ्यांना नाडणाऱ्या विमा कंपन्यांना शिवसेना धडा शिकवणार असल्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर आता बुधवार (ता. 17) च्या मोर्चाचे जंगी आयोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे.

मुंबई - पीककर्जात शेतकऱ्यांना नाडणाऱ्या विमा कंपन्यांना शिवसेना धडा शिकवणार असल्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर आता बुधवार (ता. 17) च्या मोर्चाचे जंगी आयोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे. हा मोर्चा शिवसेनेचे मुंबईत प्रचंड मोठे शक्‍तिप्रदर्शन व्हावे, यासाठी शिवसेना सरसावली असून, राज्यातील सर्व खासदार, आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख, पदाधिकारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. 

मुंबईत अनेक वर्षांनंतर शिवसेनेचा मोर्चा होत आहे. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे दोन्ही नेते मोर्चात सहभागी होणार आहेत. यामुळे या मोर्चाच्या माध्यामातून मुंबई जॅम करण्याची ताकद दाखवण्यात येईल, असे मानले जात आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांची अनेक पीक विमा कंपन्यांनी अडवणूक केली आहे. या कंपन्यांच्या मुंबईतील कार्यालयावर शिवसेना धडकणार असून प्रत्येक शेतकऱ्याला पीकविम्याचा लाभ मिळावा, यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे. शिवसेना भवन ते वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्‍समधील ऍक्‍सिस बॅंकेच्या मुख्यालयाच्या दरम्यान हा मोर्चा होणार आहे. हा संपूर्ण भाग वर्दळीचा असल्याने मोर्चाच्या दरम्यान जॅमची भीती आहे. 

शिवसेनेसाठी मुंबईतला मोर्चा म्हणजे अस्मितेचा विषय असल्याने तो भव्य दिव्य होईल, यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने कंबर कसल्याची माहिती शिवसेनेचे माध्यम प्रभारी हर्षल प्रधान यांनी दिली. 

दरम्यान, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे याच महिन्यात राज्यव्यापी दौरा करणार असून सर्व जिल्ह्यात ते मतदारांचे आभार मानणार आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला शिवसेना लागली असून प्रत्यक्ष प्रचाराची रणधुमाळी म्हणूनच बुधवार (ता.17) चा मोर्चा व आदित्य ठाकरे यांचा राज्यव्यापी दौऱ्याकडे पाहिले जात आहे. 

सारे काही निवडणुकीसाठी... 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हा मोर्चा म्हणजे शिवसेनेचे शेतकऱ्यांसाठी शक्‍तिप्रदर्शन असल्याचे मानले जात आहे. याअगोदर उद्धव ठाकरे यांनी राज्यात दुष्काळी दौरा करून शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्‍कम मिळवून देणार, अशी ग्वाही दिली होती. त्यासाठीच हा मोर्चा असल्याचे सांगितले जाते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News