दिव्यांग रोजगार स्वयंरोजगार व संघटना सक्षमीकरण मार्गदर्शन मेळावा

आकाश प्रभाकर आंबोरकर
Tuesday, 1 October 2019

आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा यांच्या वतीने दिव्यांगांच्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले

||व्यंग नव्हे हि कमतरता, माझ्यातही आहे क्षमता, नको दया नको सहानुभूती, करा दिव्यांगांच्या विशेष गरजांची पूर्ती ||  वरील म्हणीप्रमाणे दिव्यांग बांधव हा आपल्या समाजातील एक असा घटक आहे की, जो विविध समस्यांनी, विचारांनी ग्रस्त आहे. याचे कारण म्हणजे दिव्यांगाकडे कुटुंबाची, समाजाची बघण्याची दृष्टी, समाजात दिव्यांगाबाबत असलेले विचार शासकीय योजनांच्या माहितीचा अभाव, शासकीय नौकरदार वर्गाचा दिव्यांगांच्या योजना पोहचविण्यासाठी असलेला निष्काळजीपणा आणि शासनाचे शासकीय नौकरदार वर्गावर असलेले दुर्लक्ष अशा विविध कारणांमुळे आज दिव्यांग बांधव त्यांच्या विकासापासून, सक्षमिकरणापासून कोसो दुर आहेत. आज बरेचशे दिव्यांग सुशिक्षित, उच्च शिक्षीत आहेत, बर्‍याच दिव्यांगामध्ये काहि कलागुण कौशल्य दडलेले आहेत. की ज्यांच्या माध्यमातून दिव्यांग अनेक व्यवसाय, रोजगार, स्वयंरोजगार, नौकरी करू शकतात,पण आज गरज आहे ती फक्त शासकीय योजनांच्या माहितीची आणि दिव्यांगामध्ये असलेल्या क्षमता ओळखण्याची. तेव्हा या क्षमता ओळखण्याचे काम आज बर्‍याचशा स्वयंसेवी संस्थांमार्फत करण्यात येत आहेत आणि त्यासाठी बरेचशे दिव्यांग बांधवांसाठी कॅम्प, मेळावे, मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
           गडचिरोली जिल्ह्य़ातील अहेरी या तालूक्याचा परिसर म्हणजे घनदाट जंगल आणि डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे. या कारणांमुळे बऱ्याचशा योजना या लोकांपर्यंत पोहचत नाही. त्यात दिव्यांग हे तर अगोदरच दुर्लक्षीत घटक विकासापासून कोसो दुर असलेला घटक त्यांच्या पर्यंत काय विकासाच्या योजना माहिती पोहचणार. तेव्हा डोंगर दऱ्याखोऱ्यातील  दिव्यांगांच्या विकासासाठी अहेरी येथे एकता दिव्यांग बेरोजगार संघटना स्थापन करण्यास आली आणि या संघटनेच्या पुढाकाराने दि 26 सप्टेंबर 2019 ला स्थानिक हनुमान मंदिर येथे आम्हा आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा च्या च्या वतीने '' दिव्यांग रोजगार स्वयंरोजगार व संघटना सक्षमीकरण '' मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यासाठी संस्थेच्या दिव्यांग सामाजिक उद्योगजकता आणि रोजगार निर्मिती प्रकल्पाचे क्षेत्र समन्वयक लक्षमण लंजे आणि महेश निकुरे यांनी उपस्थित दिव्यांगांना त्याचे हक्क, अधिकार, रोजगार, स्वयंरोजगार, स्वयंसहाय्यता समुह, संघटना बांधनी, संघटना सक्षमीकरण, दिव्यांगांच्या शासकीय योजना अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यासोबतच 18 ते 30 वयोगटातील जे दिव्यांग कमीत कमी 10 वी पास /नापास आणि त्यापुढे शिक्षण घेतलेले आहेत अशा दिव्यांगाना खाजगी कंपन्यामध्ये रोजगार, नौकरी मिळवून देता यावी. यासाठी नागपुर येथील म्युअर मेमोरियल हॉस्पिटल मध्ये चालू असलेल्या 2 महिने प्रशिक्षणाविषयी माहिती देऊन अस्थिव्यंग, मुकबधिर, कर्णबधिर, अल्पदृष्टी दिव्यांगांनी त्याचा लाभ घ्यावा. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आणि जे दिव्यांग प्रशिक्षणासाठी पाञ आहेत अशा दिव्यांगांची नोंदनी करण्यात आली.
          या मेळाव्यासाठी राहुड सर गट साधन केंद्र अहेरी, शंकरभाऊ मगडीवार, अमोल मुक्कावार सामाजिक कार्यकर्ते अहेरी यांनी उपस्थित राहून दिव्यांगांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याच्या आयोजनाकरीता एकता दिव्यांग बेरोजगार संघटना अध्यक्ष नरेसभाऊ मेकरटिवार सचिव विनायक निकुरे सहसचिव प्रविण कोटरंगे, कोषाध्यक्ष ईरयास हुसेन यांनी व संघटनेच्या सर्व पदाधिकारी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्याला अहेरी आलापल्ली एटापल्ली या तालुक्यातील बरेचसे दिव्यांग बांधव उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News