गुणवत्तेसाठी शाळांचे स्वमूल्यांकन करणे खूप गरजेचे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 July 2019
  • सात दिवसांची मुदत; शिक्षणाधिकारी, डाएटच्या प्राचार्यांवर जबाबदारी 

महागाव - विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शाळा सिद्धी कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमानुसार नवीन सत्रात राज्यातील शाळांना ३० जुलैपर्यंत स्वयंमूल्यांकन करून ऑनलाईन माहिती भरावी लागणार आहे. स्वयंमूल्यांकन पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी तसेच डाएटच्या प्राचार्यांवर सोपविली आहे. 

प्रत्येक शाळांना दर्जानुसार श्रेणी देण्यासाठी केंद्र स्तरावरुन शाळा सिद्धी प्रणाली तयार केली आहे. शाळामधील पायाभूत सुविधा व गुणवत्तेच्या निकषांच्या आधारावर श्रेणी देण्यात येते. त्यासाठी मानके व श्रेणी तयार केले आहेत. शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची पटसंख्या, गुणवत्ता, विविध उपक्रम, शिक्षकांची कामगिरी या आधारावर हे स्वयंमूल्यमापन होईल. ही जबाबदारी शिक्षणाधिकारी व डाएटच्या प्राचार्याकडे आहे.

सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यामार्फत प्रत्येक शाळांचे मुल्यांकन करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी महत्त्‍वाचे निकष म्हणून शाळा मानके व मूल्यांकन आराखडा तयार केला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यातील सर्वात महत्त्‍वाच्या घटनांना स्पर्श करणाऱ्या मानकांचा संच आहे. प्रत्येक शाळांनी तयार केलेला मूल्यांकन अहवाल शाळेच्या दर्शनी भागात फलकावर लावणे सक्तीचे केले आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News