श्रीयश अभियांत्रिकीच्या 14 विद्यार्थ्यांची इन्ड्‌युरन्समध्ये निवड

अतुल पाटील
Tuesday, 11 June 2019
  • श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्ड्‌युरन्स टेक्‍नॉलॉजीज्‌ लि.तर्फे नुकतीच परिसर मुलाखत झाली.
  • विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
  • इन्ड्युरन्सतर्फे क्‍वॉलिटी विभागाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे यांनी मुलाखती घेतल्या.

औरंगाबाद: श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्ड्‌युरन्स टेक्‍नॉलॉजीज्‌ लि.तर्फे नुकतीच परिसर मुलाखत झाली. यात महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाच्या 14 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. श्रीयश अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या 48 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. यात श्रीयश अभियांत्रिकीचे दहा तर, तंत्रनिकेतनचे चार विद्यार्थी निवडण्यात आले. सुरवातीला कंपनीतर्फे सादरीकरण करण्यात आले. यावेळी इन्ड्‌युरन्सतर्फे मनुष्यबळविकास विभागाचे प्रमुख सुशील झाल्टे यांनी कंपनीत पुरवण्यात येणाऱ्या सुविधाविषयी माहिती दिली. बहुपर्यायी प्रश्‍न परीक्षा, गटचर्चा व वैयक्‍तिक मुलाखत याद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 

इन्ड्युरन्सतर्फे क्‍वॉलिटी विभागाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे यांनी मुलाखती घेतल्या. श्रीयश प्रतिष्ठानचे अध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्राचार्य डॉ. रामकिशन पवार, संचालक प्रभाकर माशाळकर, प्रा. स्मिता जोशी, प्रा. गोविंद ढगे, प्रा. शैला खार्डे, प्रा. निलेश देवकर, डॉ. प्रदिप भलगे, प्रा. प्रविण सत्या, प्रा. नागेश डोंगरे यांनी अभिनंदन केले. यावेळी ट्रेनिंग ऍण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अविनाश करडखेले, समन्वयक प्रा. यशोदा काळे, प्रा. आमीर शेख, प्रा. अनिल रोकडे, प्रा. गोविंद डाके यांनी पुढाकार घेतला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News