शरद इंजिनिअरिंगच्या १० विद्यार्थ्यांची निवड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील १० विद्यार्थ्यांची टीई कनेक्‍टिव्हिटी या कंपनीत निवड झाली.
  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

दानोळी - यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील १० विद्यार्थ्यांची टीई कनेक्‍टिव्हिटी या कंपनीत निवड झाली. मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सलग चौथ्या वर्षी कंपनीने शरद इन्स्टिट्यूटमध्ये कॅम्पससाठी येऊन विद्यार्थ्यांची निवड केली आहे. 

मेकॅनिकल विभागातील ऋषिकेश आवटी, अभिनंदन पाटील, विनायक शिंदे, संजना पाटील तर इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील मोनिका वरनोळे, अंकिता उगारे, पूजा नाईक, मयूरी पाटील, सीमा पाटील, शिल्पा पाटील यांची निवड झाली आहे. टीई कनेक्‍टिव्हिटी ही आंतरराष्ट्रीय कंपनी असून डिझाईन आणि मॅन्युफॅक्‍चरिंग सेंसरचे उत्पादन करते. महाविद्यालयात प्रोजेक्‍ट बेस्ड लर्निंग, व्हॅल्यू ॲडड प्रोगहॅम, इनोव्हेशन व लर्निंग सेंटर, स्टार्टअप सेंटर आदी उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी उपयोग झाला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्‍झिक्‍युटिव्ह डायरेक्‍टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. अमित चौगुले, प्रा. अभिजित केकरे आदींचे सहकार्य लाभले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News