रखरखत्या उन्हात विद्यार्थ्यांनी बनवले सीड बॉल

दीपक हिरे
Thursday, 6 June 2019
  • पहिल्या पावसात जंगलात उघड्या डोंगरावर व रानमाळांवर करण्यात येणार बोंबीग
  • अश्या प्रकारे सीड बॉल बनवून केला पर्यावरण दिन साजरा
  • भन्नाट उपक्रमाबाबत परिसरात टीम चे सर्वत्र कौतुक

वज्रेश्वरी : पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण दिनाचे अवचित्य साधून भर रखरखत्या उन्हात उन्हाची पर्वा न करता येथील संघर्ष अभियान गणेशपुरी व सायबर कॉम्पुटर कुडूस यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कोंडले गावी येथील छोट्या चिमुकल्यांनी व विद्यार्थ्यांनी  संघर्ष अभियानचे सुनील देवरे व सायबर कॉम्पुटरचे डायरेक्टर राकेश शिवदे यांच्या सोबत सीड बॉल बनवून पर्यावरण दिन साजरा केला.

उन्हाळी सुट्टीत सभोवतालीच्या विविध झाडाच्या खूप साऱ्या बिया गोळा करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी काहीतरी उपक्रम करावा, या उद्देशाने पर्यावरण दिनाचे औचित साधून या संस्थेने हा उपक्रम राबविला. यामध्ये सर्वप्रथम माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले. त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले, छोटे-छोटे गोळे करून त्यात जंगली फळे, व झाडाच्या बिया घातल्या.

त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला. हे करीत असताना पुन्हा एकदा ही मंडळी आपल्या लहानपणा मध्ये हरवून गेली होती, त्यानंतर काही वेळातच तयार झाले खूप सारे सीड बॉल! हे सीड बॉल सुकवून ते येत्या पहिल्या पावसात जंगलात उघड्या डोंगरावर व रानमाळांवर बोंबीग करण्यात येईल असे संस्थेचे सुनील देवरे व राकेश शिवदे यांच्या कडून सांगण्यात आले.

अश्या प्रकारे सीड बॉल बनवून पर्यावरण दिन साजरा केला. ते सीड बॉल लवकरच जंगलात पेरून चिमुकल्यांचा पर्यावरण संवर्धनासाठी केलेला भन्नाट उपक्रमाबाबत या परिसरात या टीमचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News