करून बघा तुम्हालाच कसं वाटतंय...

रवी खापरे
Tuesday, 6 August 2019

रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर, एखाद्या कुटुंबाची गाडी बंद पडलेली दिसली, तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा. मदत पाहिजेच असेल असं नाही, पण त्यांना थोडा धीर तर निश्चितच वाटेल. नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

भरपूर ‘व्हर्च्युअल’ मित्र, मैत्रीण असण्याचा जमाना आहे हा, पण कधी एखाद्या खऱ्या मित्राने बरं वाटत नाहीये म्हणल्यावर त्याला ‘whatsapp’वर मेसेज मध्ये ‘Tc’ म्हणण्यापेक्षा सरळ त्याच्या घरी जाऊन ‘बरा हो लवकर’ म्हणून बघा. खरं प्रेम तर मित्राचंच असतं. नंतर बघा, कसं वाटतंय!

हल्ली लग्न समारंभात प्यायच्या पाण्याची सोय एकाच ठिकाणी असते. तिथे पाणी प्यायला गेलो तर भांडे भरून, नंतरच्या व्यक्तीला देऊन बघा तहान तर सगळ्यांनाच लागते. नंतर बघा, कसं वाटतंय!

नेहमीच्या हॉटेलमध्ये गेल्यावर सकाळच्या चहाची ऑर्डर द्यायच्या आधी वेटरला ‘गुडमॉर्निंग’ म्हणून तर बघा. त्याचा तर दिवस चांगला जाईलच. पण नंतर बघा, कसं वाटतंय! 

गाडी चालवताना कुठलीशी वृद्ध व्यक्ती/ मुलं रस्ता ओलांडण्यासाठी भांबावून थांबलेली दिसतात, दरवेळी गाडीतून नाही उतरता येत, पण निदान मागच्या गाड्यांना थांबवून आधी त्यांना रस्ता ‘क्रॉस’ करता येईल, एवढं तरी करून बघा. पण नंतर बघा, कसं वाटतंय !!

स्वतःच्या जुन्या कॉलेजमध्ये, त्याच जुन्या मित्रांच्या बरोबर आपल्याच हक्काच्या ‘कट्ट्यावर’पुन्हा एकदा विनामतलब तंगड्या हलवत, गाणी म्हणत बसून बघा. एखादी शिट्टी पण मारा दणकून खूप वर्षांनी, नव्याने तरुण व्हायला कोणाला नाही आवडणार? नंतर बघा, कसं वाटतंय!

‘डोरक्लोजर’वाल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर मागून येणाऱ्या ‘स्त्री’साठी दरवाजा आवर्जुन उघडा ठेवा, ती ‘स्त्री’आहे म्हणून नाही, पण तुम्ही ‘जंटलमन’ आहात म्हणून! हे सगळं आधीपासूनच करत असाल तर क्या बात है!
नसाल करत तर नक्कीच करून बघा... बघा कसं वाटतंय!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News