पाहा धोनीच्या ग्लोजवर हा कसला लोगो

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

वर्ल्ड कप 2019 : साउदम्पटन : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला भारतीय लष्कराबद्दल असलेला जिव्हाळा सर्वश्रूत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीच्या ग्लोव्ह्जवरील लोगोने सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याच्या ग्लोव्ह्ज वर इंडियन पॅरा स्पेशल फोर्सचा लोगो लावण्यात आला आहे. 

धोनीने 2015 मध्येच पॅरा रिजिमेंटसह दोन आठवड्यांचे प्रशिक्षणही घेतले आहे. हाच लोगो त्याच्या फोनच्या कव्हरही आहे. अति महत्वाच्या ऑपरेशन वेळीच या दलाची मदत घेतली जाते. दरम्यान कालच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून विजय मिळवला. 

दरम्यान प्रथम गोलंदाजी करताना भारताचे सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सुरवातीलाच जसप्रित बुमराने आफ्रिकेला दणके दिले. त्यानंतर मधल्या षटकात युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवने त्यांना मोठ्या भागीदारी करण्यापासून रोखून धरले तर अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारने मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. 

228 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित र्माने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने आफ्रिकेवर सहज विजय मिळवला. या विजयानंतर ट्विटरवर टीम इंडियावर कौतुकचा वर्षाव होत आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News