मुख्यमंत्रिपदाचे नंतर पाहू : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019
  • जन आशीर्वाद यात्रेदरम्यान  ‘आदित्य संवाद’
  • आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल चर्चा सुरू

लातूर ः ‘आधी भगवा फडकवू, नंतर मुख्यमंत्रिपदाचे पाहू’ असे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले. जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात उस्मानाबादनंतर गुरुवारी त्यांचे लातूर जिल्ह्यात आगमन झाले. येथे ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमात एकाने विचालेल्या प्रश्‍नावर त्यांनी हे उत्तर दिले.

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मोठ्या शहरात ते ‘आदित्य संवाद’ हा उपक्रम घेत आहेत. येथे केवळ संवाद नव्हता, तर त्याला एका ‘रियालिटी शो’चे रूप दिले गेले होते. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल चर्चा सुरू आहे.

आजच्या संवादातही एका तरुणाने हा प्रश्न विचारला. त्यावर ‘आता निवडणुका येत आहेत. आधी भगवा फडकवू, नंतर मुख्यमंत्रिपदाचे पाहू’ असे हसत हसत उत्तर त्यांनी दिले. राजकीय मेगा भरतीला तुम्ही महत्त्व देता, की शासकीय मेगा भरतीला, यावर ठाकरे यांनी आपण महाराष्ट्राला महत्त्व देतो, असे उत्तर दिले. पाण्याचे राजकारण करण्यापेक्षा पडणाऱ्या पावसाचे नियोजन महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

वाहन चालविण्याचा परवाना, मतदानासाठी अठरा वर्षांची अट आहे; पण लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी या वयाची अट का नको, असा प्रश्न उपस्थित करून सर्वच राजकीय पक्ष तरुणांच्या मागे पळतात; 
पण त्यांना संधी देत नाहीत.
                                            -  आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News