पहा बिल्डर करत आहेत, आता पार्कीगमध्ये घोटाळा

तृषा वायकर (यिनबझ टीम)
Wednesday, 10 July 2019
  • मुंबईत दिवसेन दिवस लोकसंख्या वाढत आहे तसेच लोकसंख्ये प्रमाणे दिवसेंदिवस वाहन हि वाढत आहेत .
  • आज नाही म्हटलं तरी प्रत्येक घरात एक तरी गाडीचं आहे. या वाहनाच्या पार्किंग चा प्रश्न आता मोठ्या प्रमाणावर उद्भभवत आहे.

मुंबईत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, तसेच लोकसंख्येप्रमाणे दिवसेंदिवस वाहने ही वाढत आहेत. आज नाही म्हटलं तरी प्रत्येक घरात एक तरी गाडी आहेच. या वाहनाच्या पार्किंग चा प्रश्न आता मोठ्या प्रमाणावर उद्भभवत आहे.

मुंबईकरांना अधिकाअधिक पार्किंग उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेने बिल्डरांना अतिरीक्त चार एफएसआय देऊ केलेत. यासाठी महानगरपालिकेने काही उपायोजना केल्या आहेत; पण प्रत्यक्षात असे होताना दिसत नाहीये. ९३ वाहनतळांवर ५५ हजार ७४२ गाड्या पार्क होतील, असे नियोजन महानगर पालिकेने आखले होते; मात्र आत्तापर्यंत फक्त ९३ पैकी फक्त २६ वाहनतळ पालिकेच्या ताब्यात असून २१,७७८ गाड्या पार्क होतील इतकी जागा तेथे उपलब्ध आहे.

पालिकेच्या वाहनतळापासून ५०० मीटरच्या अंतरावर अवैध पार्कींग केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल. मुंबईची लोकसंख्या बघितली तर मुंबईत सुमारे ३५ लाख गाड्या आहेत व त्यासाठी फक्त ३४ हजार गाड्यांची पार्कींग उपलब्ध आहे ही पालिकेची चुक असताना त्यासाठी १० हजारांचा दंड कशासाठी? असा सवाल मुबईकरांनी महापालिकेला विचारला आहे. 

यावर विरोधी पक्षांचे असे म्हणणे आहे की मुंबईकरांना पुरेसे असे पार्किंग द्या व नंतर कारवाई करा. वाहनतळ बांधून देण्याच्या बदल्यात अतिरिक्त एफएसआय दिला गेला हा पालिकेतील एफएसआय प्रकरणी सर्वात मोठा घोटाळा असून याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News