राष्ट्रधर्मभक्त

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 September 2019

कोवाड - गेल्या महिन्यात सांगली अन् कोल्हापूरात महापुराने असे थैमान घातले होते. त्यात माझ्या तालुक्याचे बरेच नुकसान झाले. परंतु मी त्यावेळी सेवेत रजु असल्यामुळे मला काहीच करता आले नाही. मी बऱ्याच पक्ष, संघटनांकडे मदतीसाठी फोन केले परंतु खोट्या आश्वासनाशिवाय काहीच हाती आले नाही. या सर्वांविषयी मनात बरीच चीड आणि क्रोध निर्माण झाला पण असो, शेवटी सर्व गोष्टीच्या मर्यादा असतात. मग या संदर्भात काही करावे ह्यासाठी माझे प्रयत्न चालू होते.

पहिला प्रतिसाद उच्च न्यायालयातील अधिवक्ता सौ. प्राजक्ता खेडकर व अमेरिका स्थित श्री. प्रज्वल नाईक व योगेश गिलबिले ह्यांनी मला संपर्क करून आर्थिक मदत देवु केली सोबतच राष्ट्रधर्मभक्त समुहाचे माझे मित्र अमोल देसाई व राकेश हिन्दुस्थानी यांच्या मदतीने व तालुक्यातील अचुक गरजुंची माहीती काढुन त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्यासाठी मदत केली.

श्री. प्रविण पाटील यांच्या सहकार्याने आज आम्ही राष्ट्रधर्मभक्त समुहाच्या माध्यमातुन जवळपास 22 कुटुंबियांना आम्हाला  मदत करण्याचे पुण्य प्राप्त झाले. त्याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो. त्याचबरोबर या कार्यात आम्हाला सहकार्य करणाऱ्या ऋषीकेष कुट्रे, सुदाम पाटील निखिल शिरूर, संदिप दळवी विवेक मनगुतकर ह्या सर्वांचे मनपुर्वक आभार.

Photos

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News