सचिवांनी सभागृहाची दिशाभूल केली : कपिल पाटील

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 June 2019
  • मराठी भाषेवरील चर्चा पुढे ढकलण्याची नामुष्की आज राज्य सरकारवर ओढवली

मुंबई : आमदारांनी चर्चेसाठी दिलेला मसुदाच विधिमंडळ सचिवालयाकडून बदलण्यात आल्याने मराठी भाषेवरील चर्चा पुढे ढकलण्याची नामुष्की आज राज्य सरकारवर ओढवली. आमदारांनी निश्‍चित केलेला विषय सचिवालयाकडून परस्पर बदलल्याने संतापलेल्या आमदारांनी सभागृहाचे कामकाज रोखून धरले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी साहित्यिकांच्या शिष्टमंडळाची भेट घेत मराठी शिक्षण हक्क कायदा आणि प्राधिकरणाचे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विधान परिषदेत विशेष चर्चा होती. कपिल पाटील यांनी ही सूचना मांडली होती. मात्र, परस्परचर्चेचा मसुदा बदलण्यात आल्याची बाब पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. 

चर्चेचा मसुदा बदलून सचिवांनी सभागृहाची दिशाभूल केली आहे. सचिवांना हा अधिकार दिला कोणी, असा सवाल करतानाच चर्चेचा मसुदा पुन्हा वितरित करण्याची मागणी पाटील यांनी केली. यावर मराठी भाषा मंत्री विनोद तावडे म्हणाले की, मराठी प्रेमी, साहित्य संस्था आणि सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांशिवाय हा विषय पुढे जाणार नाही. त्यामुळे नवीन मसुदा तयार करून उद्या, शुक्रवारी (ता. २८) या विषयावर चर्चा करू. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News