एमएचटी-सीईटीत प्रतम आलेल्या सिद्धेश अग्रवालच्या मेहनती मागचं रहस्य...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

अमरावती  - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. मध्यरात्रीपासून निकाल संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या परीक्षेत यशस्वी कामगिरी करीत अमरावतीच्या सिद्धेश अग्रवाल 99.99 टक्के गुणांसह टॉपर ठरला आहे.

अमरावती शहराच्या शारदा विहार परिसरात वास्तव्यास असलेल्या अग्रवाल कुटुंब यांना दोन मुलं असून सिद्धेश हा लहानपणापासूनच अभ्यासामध्ये चिकाटी आणि जिद्दीने अभ्यास करतो. एमएचटी सीईटी परीक्षेसाठी लावलेल्या कोचिंग क्लासेस मध्ये जास्तीत जास्त वेळ अभ्यास करीत होतो तर सध्या दहावी आणि बारावीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करून मन लावून अभ्यास केल्यास यश नक्की मिळेल असा सल्लाही सिद्धेश याने विद्यार्थ्यांना दिला आहे. 

 मुलाला मिळालेले हे यश पाहून आपल्याला आनंद झाला असून स्पर्धात्मक परीक्षांची तयारी केल्यास विद्यार्थ्यांना नक्कीच यश मिळतं असं मत सिद्धेशच्या पालकांनी व्यक्त केले. 

राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून चार लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील तीन लाख ९२ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर २०, ९३० विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) विभागातून २ लाख ७६ हजार १६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) या विभागातून २ लाख ८१ हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News