मुटूथ फायनान्सच्या दरोड्यात वापरलेल्या गाड्याचा शोध लागला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019
  • मुटूथ फायनान्सवर भरदिवसा सशस्त्र  दरोड्या टाकणाऱ्या अज्ञातांच्या तीन बजाज पल्सर बेवारस आढळून आल्या आहेत. 
  • मुटूथ फायनान्सवर शुक्रवार रोजी चार संशयितांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.
  •  बेवारस गाड्या संदर्भात दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांना माहिती दिली.

म्हसरूळ: मुटूथ फायनान्सवर भरदिवसा सशस्त्र  दरोड्या टाकणाऱ्या अज्ञातांच्या तीन बजाज पल्सर आशेवाडीच्या रामशेज किल्लाच्या उत्तरेकडील बाजूस पेठरोड रस्त्यालगत असलेल्या जाधव वस्तीजवळ बेवारस आढळून आल्या आहेत.

संभाजी चौक ते त्रिमूर्तीचौक रस्त्यावरील उंटवाडी पुलाजवळ मधुरा टॉवर्समध्ये असलेल्या मुटूथ फायनान्सवर शुक्रवार रोजी चार संशयितांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यात फायनान्स कार्यालयातील ऑडीटर सॅज्यू सॅम्युअल अलार्म वाजवीत प्रतिकार केला, असता संशयितांनी त्यास मारहाण केली व त्यावर गोळ्या झाडल्या आणि फायनान्स व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे व कर्मचारी कैलास जैन यांना जबर मारहाण करत धारधार हत्याराने वार केले. 

यात ऑडीटर सॅज्यू सॅम्युअल हे जागीच ठार झाले, असून दोघेजण जखमी झाले आहेत. संशयितांनी या ठिकाणाहून पोबारा केला. या घटनेत संशयितांनी बजाज पल्सरचा वापर केला होता. आशेवाडी रामशेज किल्लाजवळील उत्तरेकडील बाजूस पेठरोडलगत असलेल्या जाधव वस्ती येथे राहणाऱ्या सविता जाधव यांनी शुक्रवार दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारस घराजवळच तीन पल्सर गाड्या लागलेल्या दिसल्या होत्या. शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास दत्ता जाधव यांनी सदर बेवारस गाड्या संदर्भात दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांना माहिती दिली. ही माहिती शहर पोलीसांना समजताच पोलीस  

उपायुक्त परिमंडळ - १  लक्ष्मीकांत पाटील,पोलीस उपायुक्त गुन्हे पौर्णिमा चौघुले, पोलीस उपायुक्त प्रशासन माधुरी कांगणे,सहायक पोलिस आयुक्त गुन्हे आर.आर.पाटील,अशोक नखाते, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले, गुन्हे शाखा युनिट १ व २ तसेच मध्यवर्ती युनिट अधिकारी व कर्मचारी, श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच ग्रामीण पोलीस कार्यालय स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अशोक कर्पे व कर्मचारी यांनीही धाव घेतली. ज्याठिकाणी दुचाकी बेवारस आढळून आल्या आहेत. आजूबाजूला पाहणी केली असता एका संशयिताचा शर्ट सापडला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News