विज्ञान व वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

तेल्हारा :सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यातही शैक्षणिक क्षेत्रात कमालीची स्पर्धा आहे. त्यामुळे दहावी पास झालेले विद्यार्थी विज्ञान व वाणिज्य शाखेला प्राधान्य देत आहे. कला शाखेला कमी संधी असल्याचा गैरसमज असल्याने ओढा कमी झाला आहे.

तेल्हारा :सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यातही शैक्षणिक क्षेत्रात कमालीची स्पर्धा आहे. त्यामुळे दहावी पास झालेले विद्यार्थी विज्ञान व वाणिज्य शाखेला प्राधान्य देत आहे. कला शाखेला कमी संधी असल्याचा गैरसमज असल्याने ओढा कमी झाला आहे.

दोन-तीन वर्षापासून विद्यार्थ्यांची मानसिकता बदलली असून आता कला शाखेला घरघर लागली आहे. विज्ञान व वाणिज्य शाखेला पसंती देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची दिसून येत आहे. अनेक वेळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी पुरवून विज्ञान व वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश दिला जात असे. एवढेच नाही तर १९८९-२००० या काळात काही कनिष्ठ महाविद्यालयांना वाणिज्य शाखेच्या तुकड्या वाणिज्य शाखेच्या तुकड्या बंद कराव्या लागल्या.

पुढे पुढे परिस्थिती बदलली विज्ञान व वाणिज्य शाखेला चांगले दिवस येऊ लागली. नोकरी व्यवसायामध्ये विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना संधी मिळू लागली. यामुळे विद्यार्थ्यांचा या शाखांकडे कल वाढला शिवाय विज्ञान शाखेत ३० गुणांची प्रात्याक्षिक हे प्रत्येक विषयाला आहे आणि इंग्रजी, मराठीला 20 गुणांची तोंडी परीक्षा यामुळे भरपूर टक्केवारी मिळाल्यावर सिईटीमध्ये कितीही गुण असले तरी अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढल्याने सहज प्रवेश मिळत असे व हीच परिस्थिती आजही कायम आहे तर वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतला तर बँकिंग क्षेत्र ,कारखाना, अकाउंट विभाग यासारख्या इतर ठिकाणी एखादा संगणकाचा कोर्स केल्यावर सहजपणे नोकरी प्राप्त होती भविष्यातील भविष्यातील संधी व करीयर याचा विचार करतात त्यामुळे कला शाखेतील विद्यार्थी शोधण्यासाठी आज शिक्षकांना प्रयत्न करावे लागत आहे आणि आपली तुकडी टिकवून ठेवावी लागत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News