स्काऊट-गाइड चळवळीत शाळांनी सहभागी व्हावे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • सदर कार्यक्रमाचे संचलन जिल्हा परिषद विद्यालयाचे शिक्षक दीपक राऊत यांनी केले. तर आभार प्रीती गोल्हर यांनी मानले. यावेळी कार्यालयाचे वतीने शाळांचे पथक नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मंगरूळपीर: स्थानिक जिल्हा परिषद विद्यालयात आयोजित कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी श्रीकांत माने यांनी स्काऊट-गाईड या जागतिक चळवळीत सर्व शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. भारत स्काऊट आणि गाईड, वाशीम जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग यांच्या वतीने मंगरूळपीर व मानोरा या दोन तालुक्‍यातील शिक्षकांकरिता एकदिवसीय उद्बोधन व नोंदणी वर्गाचे आयोजन येथील जिल्हा परिषद विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात  करण्यात आले होते. 

या उद्बोधन वर्गाच्या उद्घाटकीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीकांत माने, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती, मंगरूळपीर हे होते तर, अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डी. डी. आंबेकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर राजेश गावंडे, जिल्हा संघटक - स्काऊट विभाग, प्रीती गोल्हर, जिल्हा संघटक -गाईड विभाग, रमेश भोडणे, केंद्रप्रमुख, मानोली, एन. पी. खर्चे, केंद्रप्रमुख मानोरा, सुदाम भोडणे, केंद्रप्रमुख, मंगरूळपीर हे होते.

तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक मुरलीधर जाधव, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त, स्काऊट विभाग व संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा, मंगरूळपीरचे शिक्षक निलेश रमेशराव मिसाळ हे होते.  कार्यक्रमाचे सुरवातीला मान्यवरांचे हस्ते स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडेन पॉवेल यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे संचलन जिल्हा परिषद विद्यालयाचे शिक्षक दीपक राऊत यांनी केले. तर आभार प्रीती गोल्हर यांनी मानले. यावेळी कार्यालयाचे वतीने शाळांचे पथक नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यात दोन्ही तालुक्‍यातील शाळांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता भारत स्काऊट-गाईड कार्यालयाचे भेंडेकर व सदानंद सिरसाट यांनी परिश्रम घेतले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News