किल्लेबांधणी स्पर्धेत फिरके विद्यालय प्रथम

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Wednesday, 13 November 2019

किल्लेकर्स आणि कल्पतरू समूह, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, ठाणे जिल्ह्याचे मुंबई मॉम्सच्या वतीने शनिवारी वसंत विहार क्‍लब ग्राऊंड येथे विद्यार्थ्यांसाठी किल्लेबांधणी स्पर्धा व त्यांच्या पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 

ठाणे :  महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची मुलांना किती माहिती आहे आणि ते ती स्वतः किल्ला तयार करून किती उत्कृष्टरीत्या मांडू शकतात, याचा प्रत्यय ठाण्यात ‘किल्लेकर्स’च्या वतीने आयोजित केलेल्या किल्लाबांधणी स्पर्धेत आला. विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेत प्रथम क्रमांक एस. बी. फिरके विद्यालयाने पटकाविला; तर द्वितीय क्रमांक मुंब्रा येथील ज्ञानदीप विद्यामंदिर, तृतीय क्रमांक श्रीरंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकावला. विद्यार्थ्यांचे कलेचे आणि ज्ञानाचे या वेळी सर्वांनीच कौतुक केले.

किल्लेकर्स आणि कल्पतरू समूह, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, ठाणे जिल्ह्याचे मुंबई मॉम्सच्या वतीने शनिवारी वसंत विहार क्‍लब ग्राऊंड येथे विद्यार्थ्यांसाठी किल्लेबांधणी स्पर्धा व त्यांच्या पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 

इतिहासतज्ज्ञ संदीप दहिसरकार यांनी किल्ल्यांचे परीक्षण करून निकाल जाहीर केला. पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत रोहितराजे देशमुख पवार, राजकुमार महाराज सुरगाणा, सतीश देसाई, समीर देसाई, दत्ता चव्हाण यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. किल्ला स्पर्धेतील विजेत्यांसह काही ऑनलाईन स्पर्धा- चित्रकला, फोटोग्राफी, निबंध, कविता, एक सोसायटी- एक किल्ला या स्पर्धेतील विजेत्यांनाही मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News