पावसामुळे बेळगाव, खानापूरसह चार तालुक्यात उद्या शाळांना सुट्टी 

मिलिंद देसाई, बेळगाव
Tuesday, 30 July 2019

बेळगाव -  बेळगाव आणि खानापूरसह चार तालुक्‍यातील शाळांना उद्या (ता.31) सुट्टी घोषित करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. जनजीवन विस्कळीत व पावसामुळे शाळा संपर्क तुटत आहे. यासाठी जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी सुट्टी घोषित केली आहे. 

बेळगाव, खानापूर, बैलहोंगल आणि कित्तूर तालुक्‍यात शाळांना सुट्टी घोषित केली आहे. सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदान शाळांना सुट्टी आहे. शिक्षण विभागाकडून दोन दिवस शाळा सुट्टी घोषित करण्याचा प्रस्ताव दिला होता, तसा आदेशही बजाविला होता; पण जिल्हाधिकारी बोम्मनहळ्ळी यांनी सुधारीत आदेश जारी करत बुधवारी (ता.31) एकदिवसासाठी सुट्टी घोषित केली आहे.

गुरुवारी (ता.1 ऑगस्ट) सुट्टी देण्याच्या प्रस्तावावर पावसाची स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे कळविले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News