नॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

प्रसाद जोशी 
Friday, 28 June 2019
  • विरारच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या दोन्ही शाळांमधील विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली
  • पाचवीच्या अकरा तर आठवीचा 2 विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली

वसई: प्राथमिक आणि माध्यमिक महाराष्ट्र राज्य शालांत शिष्यवृत्तीचा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात विरारच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या दोन्ही शाळांमधील विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. यात पाचवीच्या अकरा तर आठवीचा 2 विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली असून सर्वसाधारण विभागातून अर्चित कोथापल्ली हा 68 विद्यार्थ्यांमधून प्रथम आला आहे. 

नॅशनल शाळेच्या अर्चित कोथापल्ली, वरद मुळे, तनुश्री विश्वकर्मा, युवराज सिंग, हिमानी खावा, राधिका निवाते, नयन जाधव, आदी पालेकर, पूर्वा चव्हाण, नेहा थाळे, नेहा जावळे, क्षितिजा सावंत व अमित्या गोळे यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विश्वस्तांनी सर्वांचे कौतुक केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News