स.भु. विज्ञान महाविद्यालयात शनिवारी कॅम्पस मुलाखती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात शनिवारी (ता. २२) लुपिन कंपनीतर्फे कॅम्पस मुलाखती होणार आहेत. 

औरंगाबाद - सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात शनिवारी (ता. २२) लुपिन कंपनीतर्फे कॅम्पस मुलाखती होणार आहेत. या मुलाखती केवळ विद्यार्थ्यांसाठी आहेत. यात विद्यार्थिनी सहभागी होऊ शकणार नाहीत.

उमेदवार हा रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेणारा असावा. यामध्ये रसायनशास्त्र विषयाच्या सर्व शाखांचा समावेश आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तीनही सत्रांत विद्यार्थ्याला सरासरी ६० टक्के गुण आवश्‍यक आहेत. निवड झालेल्या उमेदवारास २ लाख ५८ हजार रुपये वार्षिक प्रशिक्षण वेतन देण्यात येणार आहे. समाधानकारक काम असल्यास एक वर्षानंतर कायमस्वरूपी सामावून घेत तीन लाख दहा हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.

उमेदवाराला मंदीदीप एमआयडीसी, भोपाळ येथे नियुक्ती देण्यात येणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्राचार्य प्रा. डॉ. दीपक कायंदे यांनी केले आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी प्रा. डॉ. आर. ए. शास्त्री, प्रा. डॉ. सौ. जोशी, प्रा. डॉ. सचिन इंगोले, प्रा. डॉ. महेंद्र चौधरी, प्रा. अक्षय देशपांडे प्रयत्न करीत आहेत.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News