सावित्रीच्या लेकींना एसटीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019

सिदेवाही : सिदेवाही तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसवेळेवर उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महत्वाच म्हणजे विद्यार्थींनीसाठी अडचणीचे ठरत आहे. शुक्रवारला ८० विद्यार्थिनी सायंकाळी गावाला जाण्यासाठी बसची वाट बघत होत्या. शेवटी त्यांना सोडण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनीच खासगी बसची व्यवस्था करून दिली. 

सिदेवाही येथे शाळा, महाविद्यालयाची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे तालुक्यातील गावखेड्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सध्या प्रवेशाची धावपळ सुरू आहे. शाळा सुरू झाल्या आहे. परंतु एसटी अद्याप नियमित सुरू झालेल्या नाही. सकाळी बस मिळाली की, जाण्यासाठी संध्याकाळी बस मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. 

विद्यार्थीनी बसची वाट बघत सायंकाळच्या सुमाराला ताटकळत उभे राहावे लागते. राज्य परिवहन महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असा पालकांचा आरोप आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वासेरा-पिपर्डा-पळसगाव बस बंद आहे. ती लवकरच नियमितपणे चालू होईल, असे सिदेवाही आगार प्रमुखांनी सांगितले. 

आगार प्रमुखाला आणि या क्षेत्रातील आमदारांना निवेदन दिले आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी नियमित बस उपलब्ध करून द्यावी
- यादव, सर्वोदय कन्या विद्यालय, सिदेवाही 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News