सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयाची पथनाट्यातून जनजागृती

अनिकेत नवरे, यवतमाळ
Sunday, 22 September 2019

यवतमाळ - येथील सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयच्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत प्लास्टिक वापर बंदी, पाण्याची बचत अशा अनेक विषयांवर पथनाट्य करत जनजागृती केली.

दिनांक 18/09/2019 रोजी शहरातल्या पूनम चौक, गांधी चौक, दत्त चौक, नंदी चौक, लोहारा, बिरसा मुंडा चौक, आर्णी नाका, या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. मदनभाऊ येरावार व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची सुरूवात झाली. 

पाण्याची बचत व प्लास्टिक वापर बंदी अशा विषयांवर अतिशय सूचक व जनतेला या विषयांची जाणीव करून देणारे अतिशय सुंदर असे पथनाट्य समाजकार्य महाविद्यालयाकडून करण्यात आले. चेतन नंदरधने, धनंजय चौधरी, सीताराम साबळे, उत्तम आठवले, राधा राऊत, प्रांजली पाठाडे, पूजा उरकुटे, दीक्षा पाटील, काजल कुमरे या विद्यार्थ्यांनी पथनाट्यात सहभाग दर्शवला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News