औरंगाबादेत होतेय नव्या शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019

एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी (ता. 23) ही कार्यशाळा होणार आहे. 

औरंगाबाद - लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे नवे शैक्षणिक धोरण - 2019 विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी (ता. 23) ही कार्यशाळा होणार आहे. 

कार्यशाळेत शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे सचिव अतुल कोठारी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य डॉ. सुषमा यादव उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेत 100 पेक्षा अधिक प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात अशी पहिलीच कार्यशाळा होत आहे. उपस्थितांना "नवे शैक्षणिक धोरण - 2019' ची माहिती देऊन त्याचे अभिप्राय घेणे, कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कुलगुरू डॉ. व्ही. आर. शास्त्री, कुलसचिव डॉ. देवसरकर यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठातर्फे डॉ. ब्रिजेश अय्यर, एमआयटीतर्फे प्राचार्य डॉ. निलेश पाटील, डॉ. अतुल सराफ कार्यरत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News