सातपाटी एक बुडत असलेलं गाव......

प्रा. भूषण भोईर
Monday, 5 August 2019

सोबत तिथीला व्हिडिओ पाठवत आहे रात्र वैऱ्याची आहे. स्वतः जागे व्हा इतरांनाही जागे करा आणि समुद्र खाड्या खाजणे बुजवणारे, मच्छीमारांच्या जीवाशी खेळणारे प्रकल्प त्वरित थांबवा.
 
भारतीय पर्यावरण चळवळ
सह.प्राध्यापक सोनोपंत दांडेकर महाविद्यालय
M.SC. Oceanography (समुद्र विज्ञान)
प्रा. भूषण भोईर.
  8237150523/7083031150.

साधारण गेल्या वर्षापासून सातपाटी गावात समुद्राच्या भरतीचे पाणी शिरू लागलं. पाऊस जास्त झाला असता प्रचंड लाटा तडाख्या सहित समुद्राचे पाणी धूप प्रतिबंधक बंधारा फोडून आत शिरू लागलं. गेल्यावर्षी या गावाची पाहणी केली होती त्यावेळेस साधारणतः दोनशे घरं या पाण्याने बाधित झाली होती. या वर्षी ठीक ठिकाणी भरतीचे पाणी घरात शिरू नयेत म्हणून लोकांनी उंबरठ्यात दोन फुटाचे भिंतीचे बांधकाम केले तरी देखील बऱ्याच लोकांच्या घरात पाणी शिरायचं ते शिरलाच.

लवकरच सातपाटी काळाच्या पडद्याआड होईल असंच दिसतं आहे. कारण आता जिथे लोक राहत आहेत आणि ते जिला स्वतःची जमीन समजत आहेत की त्यांची राहिली नाहीच मुळी. ती जमीन आता कायमची समुद्राची झाली आहे. त्याच्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रांमधली झाली आहे. हे लोकांनी समजणे गरजेचे आहे. समुद्राच्या या भारती ओहोटीला आजपर्यंत कोणालाही अडवता आले नाही आणि येणार नाही. गावातील लोक गावाला समुद्रा पासून संरक्षक भिंत बांधून वाचवायचा विचार करत आहेत. पण हा प्रयत्न काही काळ सफल होईल पण याचे दूरगामी परिणाम अतिशय भयानक होतील. उदाहरण द्यायचे झाल्यास अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स या शहराचे देता येईल. हे शहर मिसिसिपी नदीच्या पात्रालगत उभे होते. शहराला बुडण्यापासून वाचवण्यासाठी मोठी महाकाय आणि प्रचंड भिंत बांधली होती. परंतु ती भिंत देखील पाण्याच्या प्रचंड प्रवाहाला थांबवू शकली नव्हती. पाणी संरक्षक भिंत फोडून शहरात शिरल. आणि न्यू ऑर्लिन्स से शहर दहा ते वीस फूट पाण्याखाली गेलं आजही या पुरातून ते पूर्णतः बाहेर आले नाही. जिथे अमेरिकेसारखी प्रगत राष्ट्र पाण्याच्या प्रवाहाला आणि निसर्गाच्या शक्तींना थांबवू शकली नाहीत तिथे आपला तर प्रश्नच उरत नाही.

इथे लोकांनी शासनाकडे संरक्षक भिंतीऐवजी सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन मागणे गरजेचे आहे. प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की येत्या वीस वर्षात आयपीसीसी, जागतिक हवामान संघटना यांच्या अहवालानुसार समुद्रपातळी 80 फुटापर्यंत वाढणार आहे. आणि दर वर्षी आपली जागा समुद्र भरती ओहोटीरेषा वाढवून अधिग्रहित करत आहे. आणि त्यामुळे गावांमध्ये पाणी शिरत आहे. सर्वत्र समुद्रकिनाऱ्यांवरती समुद्राच्या पाण्याचा तडाखा वाढत आहे. आणि समुद्र किनारे कापत कापत आणखी समुद्र आत शिरत आहे. त्याला कुठलीच संरक्षक भिंत थांबवू शकणार नाही. आज-काल हवामान बदलामुळे अचानक अतिवृष्टी होत असते, मोठमोठी  चक्रीवादळे आणि अतिवृष्टी याचे पाणी सहज नद्या खाड्यांमध्ये जाता यायला हवे त्यासाठी नद्या खाड्या यांच्या मुखातील भराव काढून टाकला पाहिजे. चक्रीवादळे आणि अतिवृष्टी यांना आपण आळा घालू शकत नाहीत. त्यामुळे अशा कितीतरी भिंती निसर्ग शक्ती होत्याच्या नव्हत्या करतात. त्यामुळे यापुढे निसर्ग शक्तींचा आदर करत समुद्रात होणारे सर्व भराव वाढवन बंदर, जिंदाल जेट्टी, कोस्टल रोड सारखे समुद्राच्या भरती ओहोटीची रेषांमध्ये येणारी बंदरे त्वरित कायमची रद्द केली पाहिजेत.(अमेरिका, इंग्लंड फ्रान्स जर्मनी इत्यादी देशांमध्ये समुद्रात भराव घालणे कायमचे बंद केले आहे.

सातपाटी पासून अगदी चार किलोमीटरवर असलेलं नांदगाव येथील प्रस्तावित जिंदल जेट्टी थांबवली पाहिजे कारण सदर बंदर बांधण्यासाठी समुद्रामध्ये सहा किलोमीटर आडवी भिंत बांधण्यात येणार आहे. या भिंतीमुळे सातपाटी पासून उत्तरेकडे वाहणाऱ्या समुद्राच्या प्रवाहाला समुद्रा अंतर्गत भिंत बांधल्यामुळे अडथळा निर्माण होईल आणि परिणामी समुद्राच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह हा सातपाटीच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यावर तडाखा मारेल आणि सातपाटी बुडून जाईल. तरी सर्व मच्छीमार बांधवांना आणि शासनाला माझी नम्र विनंती आहे की असे प्रकल्प यापुढे कुठेच आणू नयेत. आणि *मच्छीमारांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी असे प्रस्तावित प्रकल्प त्वरित हाणून पाडायला पाहिजेत. नाहीतर भविष्यात आपल्या मुलाबाळांसह जलसमाधी घ्यायला तयार रहा.

सोबत तिथीला व्हिडिओ पाठवत आहे रात्र वैऱ्याची आहे. स्वतः जागे व्हा इतरांनाही जागे करा आणि समुद्र खाड्या खाजणे बुजवणारे, मच्छीमारांच्या जीवाशी खेळणारे प्रकल्प त्वरित थांबवा.
 
भारतीय पर्यावरण चळवळ
सह.प्राध्यापक सोनोपंत दांडेकर महाविद्यालय
M.SC. Oceanography (समुद्र विज्ञान)
प्रा. भूषण भोईर.
  8237150523/7083031150.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News