साताऱ्याची पोरं शिष्यवृत्तीत भारी; 949 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

विशाल पाटील
Thursday, 20 June 2019
  • सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
  • शहरी व ग्रामीण याद्यांमध्ये यावर्षीही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार यश संपादन केले आहे.

सातारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) मध्ये सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. सीबीएसई शाळेतील गुणवत्ता यादीत (पाचवी) अनुष्का पाटील व राज्यस्तरीय गुणवत्ता यादी शहर विभागात (आठवी) राधिका इंगळे हिने प्रथम क्रमांक मिळविला. 

राज्यस्तरीय परीक्षा परीक्षेच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या शहरी व ग्रामीण याद्यांमध्ये यावर्षीही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार यश संपादन केले आहे. त्यामध्ये हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज, पालिका शाळा क्रमांक पाच वाई, छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघेश्‍वर, छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज, दिशा इंग्लिश मिडियम स्कूल वाई या शाळांतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर यश मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला. इयत्ता पाचवीच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादी शहर विभागामध्ये 21, सीबीएसई शाळेतील गुणवत्ता यादीत दोन, राज्यस्तरीय गुणवत्ता यादी ग्रामीण विभागात नऊ विद्यार्थी, आठवीच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादी शहर विभागात 15, राज्यस्तरीय गुणवत्ता यादी ग्रामीण विभागात 11 असा 58 विद्यार्थ्यांनी राज्यात डंका पिटला. 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातून 19 हजार 634 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील सहा हजार 209 विद्यार्थी पात्र ठरले, तर 474 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी 14 हजार 628 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील तीन हजार 476 विद्यार्थी पात्र ठरले, तर 475 विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळाली आहे. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची शाळानिहाय नावे पुढील प्रमाणे : 

राज्यस्तरीय गुणवत्ता यादी शहर विभाग (पाचवी) : 
अस्मिता बाळासाहेब राऊत (शाळा क्रमांक पाच वाई पालिका) राज्यात तिसरी, अथर्व भिमसेन पवार (अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा) राज्यात चौथा, संचित सचिन जाधव (शाळा क्रमांक पाच, वाई पालिका) राज्यात पाचवा, उत्कर्ष दिलीप राक्षे (अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा) राज्यात सहावा, श्रृतिका चंद्रकांत सूर्यवंशी (शाळा क्रमांक पाच, वाई पालिका) राज्यात आठवा क्रमांक मिळविला.

तसेच युवराज संजय कुंभार, अथर्व विकास लोहार (माने देशमुख विद्यालय), चिन्मय राजाराम कोळी, सई सयाजी सुर्वे (छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज), पार्थ महेंद्र देसाई (रोटरी शाळा, कोयना वसाहत), महेंद्र गणेश देशपांडे, हिृदेश योगेश शेटे (न्यू इंग्लिश स्कूल, सातारा), कृष्णाली प्रकाश पवार (नगरपालिका शाळा क्रमांक तीन, सातारा), प्रसाद श्रीकांत मांडवे, प्रशांत श्रीपती पोळ (नगरपालिका शाळा क्रमांक पाच, वाई), वेदांती विजय पाटील (रोटरी शाळा, कोयना वसाहत), अमर राजू सिंग (नगरपालिका शाळा क्रमांक सहा, वाई), सायली संतोष माने (छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज), प्रियानी महादेव पाटील, ओम अनंत कुटे (यशवंत हायस्कूल, कऱ्हाड), आदित्य अरविंद मगर (छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज) यांनी राज्यस्तरीय यादीत यश मिळविले. 

राज्यस्तरीय गुणवत्ता यादी ग्रामीण विभाग (पाचवी) : 
नुरेन जावेद इनामदार (जय भवानी विद्यालय, पाचवड, वाई) राज्यात पाचवा, आर्य गजानन चेणगे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघेश्‍वर) राज्यात सातवा, शमा असिफ शेख (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघेश्‍वर) राज्यात सातवी, गौरव मोहन करे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्डी, माण), राज्यात सातवा, सुहाना सादिक शेख (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघेश्‍वर) राज्यात आठवी, आर्य शांताराम पवार (जय भवानी विद्यालय पिंगळी, माण), अथर्व अप्पासाहेब जाधव (जयराम स्वामी वडगाव विद्यालय, खटाव), जैनाब मुस्ताक मुल्ला, स्वराली धनंजय बर्गे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघेश्‍वर) राज्यात दहावी क्रमांक मिळविला. 

सीबीएसई शाळेतील गुणवत्ता यादी (पाचवी) : 
अनुष्का जयंत पाटील (श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल, जाधववाडी, फलटण) हिने राज्यात प्रथम, समृध्दी मधुकर जाधव (रयत इंग्लिश मिडियम स्कूल, सातारा) ही राज्यात पाचवी. 

राज्यस्तरीय गुणवत्ता यादी शहर विभाग (आठवी) : 
राधिका संजय इंगळे (हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज) राज्यात प्रथम, चिन्मय अनिल इनामदार (हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज) राज्यात पाचवा, मृणाल धनंजय कथरे (हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज) राज्यात पाचवा, अवंतिका विक्रमसिंह घाटगे (छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज), प्रज्वल सुरेश जाधव (हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज) हे राज्यात अकरावे, शुभम शिवाजी पाटील (दिशा स्कूल, वाई) राज्यात बारावा क्रमांक मिळविला. रणजित दत्ताजी शिंदे, उज्ज्वल किशोर खाडे (हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज), उत्कर्ष चंद्रकांत निकम (महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा), शारदा प्रताप निकम (हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज), सिध्दांत धनंजय चिंचकर (शिवाजी हायस्कूल वडूज), अथर्व मनोज चाळके, आशिष सुरेश पाटील (अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा), वेदांत संतोष शिंदे (दिशा स्कूल, वाई), इशा दादासाहेब गावडे (शिवाजी हायस्कूल वडूज) यांनीही राज्याच्या यादीत स्थान मिळविले. 

राज्यस्तरीय गुणवत्ता यादी ग्रामीण विभाग (आठवी) : 
तनिष्का अरविंद चिरमे (नव महाराष्ट्र विद्यामंदिर ऍण्ड ज्युनिअर कॉलेज) राज्यात सहावी, जीवन संजीव कारंडे (दिशा इंग्लिश मिडियम स्कूल, वाई) राज्यात सातवा, आर्शिया गफ्फूर काझी (लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूल) राज्यात तेरावी, सई कैलास वैद्य (दिशा इंग्लिश मिडियम स्कूल, वाई) राज्यात चौदावी आली. रिध्दी गणेश सुर्वे (दिशा इंग्लिश मिडियम स्कूल, वाई), शुभंकर संतोष शिंदे (भारतमाता विद्यालय मायणी), वेदांत दिपक लेंभे (दिशा इंग्लिश मिडियम स्कूल, वाई), तन्मय रविंद्र सूर्यवंशी (भारती विद्यामंदिर, संभाजीनगर, सातारा), सुदर्शन विनोद मोझर (बी. एस. माध्यमिक विद्यालय मोरजीवाडा), अथर्व संतोष नेवसे (ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय, शिरवळ), हार्दिक विकास कुमटेकर (प्रोगेसिव्ह प्रायमरी कॉन्व्हेंट स्कूल) यांनीही यश मिळविले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News