याठिकाणी मिळते चक्क १० रुपयांत साडी; जाणून घ्या मान्सून ऑफर  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

उल्हासनगर: ठिकठिकाणी साडी आणि कपड्यांवरील ऑफर आपण पाहत असतो, मात्र उल्हासनगरमधील एका दुकानात चक्क १० रुपयांत साडीची विक्री होत आहे. उल्हासनगर कॅम्प २ मधील रंग क्रिएशन या दुकानात अवघ्या दहा रुपयाला साडी मिळते आहे. उल्हासनगरमध्ये लातूरकर बालाजी साखरे उर्फ अश्विन यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही लूट ऑफर सुरु केली आहे. 

महिलांची आवडती वेशभूषा म्हणून साडीला ओळखले जाते.  उल्हासनगर शहरातील कॅम्प २ मधील राहुल शूजसमोर असलेल्या रंग क्रिएशन या दुकानात पहायला मिळत आहे. ५ जूनपासून साड्यांचा ही ऑफर सुरु केला आहे. जर तुम्हाला महिला बचत गटासाठी एकाच रंगाच्या साड्या घ्यायच्या असतील तर त्यादेखील रंग क्रिएशनमध्ये उपलब्ध आहेत. 

याबाबत रंग क्रिएशनचे मालक बालाजी साखरे उर्फ अश्विनी याना विचारले असता त्यांनी १० रुपयांत साडी हि सुविधा फक्त सकाळी साडे १० ते १२ वाजे पर्यत सुरु असते. त्यांनी सांगितले की, प्रत्येक जून महिन्यात आम्ही अशा प्रकारे आमच्या ग्राहकांची सेवा करणार आहोत. उरलेले ११ महिने व्यवसाय केला जातो, त्याची परतफेड म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे दुकानात नवीन ग्राहक येतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News