या महिला क्रिकेटपटूंने केलं न्यूड फोटोशूट, पाहा फोटो

सकाळ (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

इंग्लंडच्या क्रिकेट संघाची यष्टीरक्षक सारा टेलरने जनजागृतीसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. 

लंडन : क्रिकेटविश्वातील सर्वच खेळाडू जनजागृतीसाठी नेहमी पुढाकार घेत असतात. यावेळीही इंग्लंडच्या क्रिकेट संघाची यष्टीरक्षक सारा टेलरने जनजागृतीसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. 

सारा भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच चपळ यष्टीरक्षण करते. साराने नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्येही ती यष्टीरक्षण करताना दिसत आहे मात्र, यावेळी तिच्या अंगावर एकही कपडा दिसत नाहीये. womens health uk या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी तिने हे फोटोशूट केले आहे. 

''जे मला खूप चांगलं ओळखतात त्यांना माहीत आहे हे असे फोटोशूट करणे माझ्या कंफर्ट झोनच्या पलिकडचे आहे. पण, एका चांगल्या उद्देशासाठी मी हे केले आहे. womens health uk या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी मी हे फोटोशूट केले आहे. मी नेहमी माझ्या शरीराबद्दल तक्रार करायचे. मात्र, या फोटोशूटसाठी मला त्या सगळ्या तक्रारींवर मात करावी लागली. प्रत्येक मुलगी ही सुंदरच असते,'' अशी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर टाकली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News