चक्क सपना चौधरी सांगतेय, मुलींना कधीही डान्सर करू नका..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

आजपर्यंत सपना हिने तिच्या चाहत्यांच नेहमीच मनोरंजन केलं आहे. काही प्रेक्षकांच्या अश्लील कमेंटचा देखील सामना तिने केला आहे. या सर्व गोष्टींमध्ये तिने स्वतःच अस्तित्व निर्माण केलं आहे. 

हरियाणा : हरियाणाची फेमस डान्सर सपना चौधरी ही आपल्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. बिगबॉसमधील सेलिब्रिटी ते अभिनेत्री हा प्रवास करत ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिचे डान्स शो एवढ्या मोठ्या प्रमाणात हिट होतात की, तिच्या डान्स शोला मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी असते. त्यामुळे तिच्यासारखं डान्सर व्हावं असं अनेकांना वाटते. सपनाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मात्र सपना हिचे याबाबत वेगळंच मत आहे.  "कधीही डान्सर होऊ नका, असा सल्ला तिने चाहत्यांना दिला आहे. सपना चौधरी हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती तिच्या चाहत्यांना डान्सर न होण्याचा सल्ला देत आहे.

डान्स परफॉर्मन्सनंतर सपनाच्या जवळ लहान मुली येऊन त्यांच्यासोबत तिने डान्स करावा अशी विनंती करताना दिसतेय. या मुलींसोबत सपना गप्पा मारताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण मुलींच्या आई- वडिलांना ती मोलाचा सल्लाही देते. जर तुम्ही मुलीला डान्सर करण्याचं स्वप्न पाहत असाल तर असं अजिबात करू नका. हे सोपं नाहीये. शिका, मोठे व्हा नाव कमवा पण डान्सर होऊ नका, असंही ती म्हणाली. 

डान्सर म्हणून मी काय सहन केलंय, हे माझंच मला माहित आहे. प्रत्येकामध्ये एवढी सहन करण्याची ताकद नसते. मला तर असं वाटतं की एक दिवस या जगातून डान्सर ही संज्ञाच नष्ट व्हावी.’ यानंतर सपना लहान मुलींना स्टेजवर बोलावते आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेते. आजपर्यंत सपना हिने तिच्या चाहत्यांच नेहमीच मनोरंजन केलं आहे. काही प्रेक्षकांच्या अश्लील कमेंटचा देखील सामना तिने केला आहे. या सर्व गोष्टींमध्ये तिने स्वतःच अस्तित्व निर्माण केलं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News