संतोष जुवेकर नव्या भुमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

संतोष जुवेकर त्याच्या आगामी ‘अधम’ चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील डॅशिंग हिरो म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर. संतोषने साकारलेल्या भूमिका आजवर प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या.

आता तो त्याच्या आगामी ‘अधम’ चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात तो एका गावातील अनाथ आणि टपोरी मुलाची भूमिका साकारत आहे. शिवाय या चित्रपटाला प्रेमकथेची किनार असणार आहे.

शहरीकरणाच्या नावाखाली खाणींची केलेली दुर्दशा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. संतोषबरोबरच अभिनेत्री गौरी नलावडे या चित्रपटात काम करणार आहे. अभिषेक केळकर दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २८ जूनला प्रदर्शित होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News