संजय राऊतांची पाकिस्तानमध्ये पोस्टरबाजी पाहा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • आज जम्मू काश्मीर घेतले आहे, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरही घेऊ' अशी सडेतोड भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांनी राज्यसभेत मांडली
  • इस्लामाबादमध्ये "महाभारत - स्टेप फॉरवर्ड" असे लिहिलेली पोस्टर्स लागली असून, यामध्ये संजय राऊत यांचे फोटो आणि नाव आहे

मुंबई: 'आज जम्मू काश्मीर घेतले आहे, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरही घेऊ' अशी सडेतोड भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांनी राज्यसभेत मांडली. राऊत यांचं हे भाषण देशभरात गाजलंच मात्र या भाषणाची क्रेज पाकिस्तानात ही पोहोचली आहे. 

इस्लामाबादमध्ये "महाभारत - स्टेप फॉरवर्ड" असे लिहिलेली पोस्टर्स लागली असून, यामध्ये संजय राऊत यांचे फोटो आणि नाव आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असून, राऊत यांच्या नावाची चर्चा पाकिस्तानात ही सुरू झाली आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भाषण केलं होते. आज जम्मू काश्मीर घेतले आहे, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरही घेऊ अस वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी अखंड भारताचं स्वप्न पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले होते.

राऊत यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशियल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर पाकिस्तानातही हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर राऊत यांच्या नावाची चर्चा इस्लामाबाद मध्ये सुरू झाली आहे. 

पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या साजिद नावाच्या तरुणाने हा पोस्टर दाखवणारा व्हिडिओ ट्वीट केला असून, आपल्या देशात भारतातले लोक अशा पद्धतीची पोस्टर्स लावत आहेत आणि आपण काय करत आहोत, असा सवाल त्याने विचारला आहे.

इस्लामाबादमध्ये जागोजागी अशी पोस्टर्स कशी काय लागू शकतात, असा सवालही त्याने विचारला आहे. पोस्टर जरी माझे असले तरी ते शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे पोस्टर आहेत. हे पोस्टर म्हणजे शिवसेनेचे विचार आता सर्वांना पटू लागल्याची पावती असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे व्यक्त केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News