लीलावतीमधून बाहेर पडताना राऊत काय म्हणाले, पाहा..!
- राऊतांवर इतकी मोठी शस्त्रक्रिया होऊनही त्यांनी दोन दिवस थेट लीलावतीतून ट्विट केले. तर काल सामनासाठी संपादकीय लिहिला. त्यांच्या या जिद्दीचे सगळीकडू कौतुक होत आहे.
मुंबई : अँजिओप्लास्टीच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शिनसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज (ता. 13) डिस्चार्ज देण्यात आला. रूग्णालयातून बाहेर पडतानाही राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. तसेच आज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका होणार आहेत. त्यामुळे पुन्हा सत्तासमीकरणे बदलतात का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
दोन दिवसांपूर्वीच (ता. 11) संजय राऊत यांना रूटीन चेकअपसाठी लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर करण्यात आलेल्या अँजिओग्राफीमध्ये दोन ब्लॉकेज आढळले. त्यामुळे डॉक्टरांनी लगेच अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला. राऊतांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्याच दिवशी राज्यपालांनी शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली होती. पण काही कारणांनी शिवसेना बहुमत सिद्ध करू शकली नाही.
राऊतांवर इतकी मोठी शस्त्रक्रिया होऊनही त्यांनी दोन दिवस थेट लीलावतीतून ट्विट केले. तर काल सामनासाठी संपादकीय लिहिला. त्यांच्या या जिद्दीचे सगळीकडू कौतुक होत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, आशिष शेलारांपासून सर्वच नेत्यांची राऊतांना भेटायला लीलावतीत रीघ लागली होती.
Shiv Sena leader Sanjay Raut after being discharged from Mumbai's Lilavati Hospital: The next Chief Minister will be from Shiv Sena. #MaharashtraGovtFormation pic.twitter.com/hIo3Vd9ZVy
— ANI (@ANI) November 13, 2019
आज सकाळी नवाब मलिक, हुसेन दलवाई, विश्वजीत कदम, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनीही लीलावतीत जाऊन राऊतांची विचारपूस केली. सध्या शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बहुमतासाठी चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आघाडीच्या नेत्यांना भेटण्यासाठी मुंबईच्या ट्रायडंट हॉटेमध्ये गेले आहेत. काल (ता. 12) संध्याकाळीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, त्यानंतर आता सूत्रे कशी हालतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
संजय राऊतांचे आजचे ट्विट
संजय राऊत नेहमीच काही निवडक कवींच्या काही ओळी ट्विट करत असतात. काल व आज त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या काही ओळी ट्विट केल्या आहेत. आज राऊतांनी फक्त 'अग्नीपथ अग्नीपथ अग्नीपथ' इतकेच सूचक ट्विट करून इशारा दिला आहे. या ट्विटवरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.