संजय राऊत यांनीही दिली आहे "एक गोड बातमी"

यिनबझ टीम
Saturday, 16 November 2019

एनडीएची स्थापना चार प्रमुख नेत्यांनी केली होती, तेव्हाची एनडीए आणि आत्ताचे एनडीए यात खूप फरक आहे, जर तुमचा प्रश्न आहे तुम्हाला एनडीए मधून बाहेर काढले का? तर ते मला ठाऊक नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केले. गोड बातमी लवकरच मिळेल, असे वक्तव्यही त्यांनी केले. 

एनडीएची स्थापना चार प्रमुख नेत्यांनी केली होती, तेव्हाची एनडीए आणि आत्ताचे एनडीए यात खूप फरक आहे, जर तुमचा प्रश्न आहे तुम्हाला एनडीए मधून बाहेर काढले का? तर ते मला ठाऊक नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केले. गोड बातमी लवकरच मिळेल, असे वक्तव्यही त्यांनी केले. 

मुंबई :  एनडीएची स्थापना चार प्रमुख नेत्यांनी केली होती, तेव्हाची एनडीए आणि आत्ताचे एनडीए यात खूप फरक आहे, जर तुमचा प्रश्न आहे तुम्हाला एनडीए मधून बाहेर काढले का? तर ते मला ठाऊक नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केले. गोड बातमी लवकरच मिळेल, असे वक्तव्यही त्यांनी केले. 

राऊत म्हणाले, "आता एनडीएचे प्रमुख कोण होत आणि आज कोण आहे? आम्ही पाहिले होते की एनडीएचे निर्णय बसून बोलून घेतला जायचे. आज आम्हाला कळते आहे की दोन्ही सभागृहाचे  शिवसेनेचे सदस्य आहेत त्यांच्या बसण्याच्या जागा बदलण्यात आल्या आहेत. आमच्या मनात शंका नाही, तुमच्या मनात का? महाराष्ट्रात सरकार बनतंय त्यात सेनेचा मुख्यमंत्री नेतृत्व करेल. सरकारचं नेतृत्व उद्धव साहेबांनी करावे असं आम्हाला वाटतं. सेना एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार नाही, कारण तसं वातावरण राहीलं नाही, याचं आम्हाला दुःख आहे.''

ते पुढे म्हणाले, "एनडीएच्या स्थापनेत सेनेचा पुढाकार होता. मोठं काम केलं होतं. जॉर्ज फर्नांडिस निमंत्रक होते. एनडीएमध्ये प्रत्येक घटक पक्षांशी संवाद होता. निर्णय घेताना निमंत्रक संवाद साधायचे., पण हा संवादच संपलाय काही वर्षात त्यामुळे एनडीए आहे का? ते अस्तित्वच मुळातून नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय, कोणी एक पक्ष एनडीए नाही. आतापर्यंत सगळे मिळून होते, नंतर मेगा भरती झाली. ज्यांचा काही सबंध नव्हता ते त्यात आले.  ते सर्व जण पेईंग गेस्ट सारखे आहेत.'' 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News