'इंशाअल्लाह'! सलमान - आलियाची जोडी ठरणार फ्लॉप?

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Saturday, 20 July 2019
  • संजयलिला भन्सालींचा आगामी 'इंशाआल्लाह' चित्रपट सध्या चांगलाचं चर्चेत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री आलिया भट स्क्रिन शेअर करणार आहेत.
  • एकीकडे सलमानचे चाहते हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत, तर दुसरीकडे अनेक लोक सलमान आणि आलियाच्या वयाच्या अंतरावरून खिल्ली उडवू लागले आहेत.​

मुंबई :  संजयलिला भन्सालींचा आगामी 'इंशाआल्लाह' चित्रपट सध्या चांगलाचं चर्चेत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री आलिया भट स्क्रिन शेअर करणार आहेत. एकीकडे सलमानचे चाहते हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत, तर दुसरीकडे अनेक लोक सलमान आणि आलियाच्या वयाच्या अंतरावरून खिल्ली उडवू लागले आहेत. मात्र सलमान आणि आलियाने चित्रपटाला होकार कळवल्यानंतर दोघांच्या स्टार कास्टवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोघांची जोडी ही स्क्रिनवरर चांगली दिसणार नाही. ईतकचं नाही तर भन्सालींनी निवडलेली जोडी ही चुकीची आहे. सलमान-आलियाची जोडी कधीच हिट होणार नाही, असा घणाघाती आरोप देखील काहींनी केला आहे.  
 

 

मात्र, या प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत, भन्सालींनी जाणीवपूर्वक सलमान-आलियाची जोडी निवडलेली आहे. सलमान- आलियाच्या वयातील अंतर हे 27 वर्ष असुन दोघांचे वय हे चित्रपटातील कथेशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे सलमान-आलियाला या चित्रपटात निवडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 
 

आलिया आणि सलमानच्या वयाचा अंदाज घेऊनच या चित्रपटाची कथा बनवण्यात आली आहे. 'इंशाअल्लाह'मध्ये सलमान मध्यम वयाच्या बिजनेसमॅनची भूमिका साकारणार आहे. तर आलिया अर्ध्या वयाच्या तरुणीची भूमिका साकारणार आहे. अर्थातच याचित्रपटात वेगवेगळ्या जनरेशनची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2020मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रर्दशित होणार आहे.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News