संजय दत्त आता मराठी चित्रपटात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

अभिनेता संजय दत्तने रोमॅंटिक, ॲक्‍शन आणि कॉमेडी असे सगळ्याच प्रकारचे चित्रपट केले आहेत. अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर आता तो मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून नाही तर एक निर्माता म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘बाबा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती तो करणार आहे. नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याची माहिती त्याने दिली. संजूने हा चित्रपट त्याचे वडील सुनील दत्त यांना समर्पित केला आहे.

या चित्रपटात अभिनेता दीपक दोब्रियाल हा मुख्य भूमिकेत दिसेल.

नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. दिग्दर्शन राज आर गुप्ता करणार आहेत. हा चित्रपट २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News