तब्बल दोन वर्ष चालणार एक सॅनिटरी नॅपकीन; तरुणांचा अनोखा प्रयोग

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा-यिनबझ)
Thursday, 22 August 2019
  • दिल्ली आयआयटी यांच्यासी संबंधित एका नव्या स्टार्टअपनने सॅनिटरी नॅपकिन बनवले आहे
  • एका सॅनिटरी नॅपकिनचा 120 वेळा पुनर्वापर करता येणार आहे.
  •  दोन नॅपकिन पॅडची किंमत १९९ रुपये असणार आहे. 

दर महिन्याला सॅनिटरी नॅपकीन विकत घेण्याची आता महिलांना गरज नाही. दिल्ली आयआयटी यांच्यासी संबंधित एका नव्या स्टार्टअपनने सॅनिटरी नॅपकिन बनवले आहे. एका सॅनिटरी नॅपकिनचा 120 वेळा पुनर्वापर करता येणार आहे. विशेष म्हणजे हे नॅपकिन केळ्याच्या तंतूपासून बनवण्यात आले आहे. आर्चिस अग्रवाल आणि हॅरी सेहरावत या तरुणांनी हे सॅनिटरी नॅपकिन तयार केले आहेत. दोन नॅपकिन पॅडची किंमत १९९ रुपये असणार आहे. 
 

पर्यावरण पुरक-
तरुणांनी केळ्याच्या तंतूपासून तयार केलेले सॅनिटरी नॅपकीन हे पर्यावरणपुरक आहेत. वापरानंतर त्यांचे लवकर विघटन होते. बाजारात विकत मिळणारे सॅनिटरी नॅपकिन हे सिंथेटिक आणि प्लास्टिक यापासून बनवले जातात. नॅपकिनच्या वापरानंतर विघटन होण्यास ५० ते ६० वर्षांहून अधिक कालावधी लागतो. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची शक्यता असते.  

सॅनिटरी नॅपकिनची रचना-
कापडाचे चार थर जोडून सॅनिटरी नॅपकिन बनवण्यात आले आहे. तसेच हे नॅपकिन वापरुन झाल्यानंतर थंड पाणी आणि डिटर्जंटने धूतल्याने १२० वेळा पुन्हा वापरता येणार आहेत.

विदेशात निर्यात-
तरुणांनी हे सॅनिटरी नॅपकिन नेपाळ देशात निर्यात केले आहे. तसेच अफ्रिकन देशांतही पाठवले आहेत. या सॅनिटरी नॅपकिनचे महत्व इतर देशांना पटवून देण्याचा प्रयत्न हे तरुण करत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News