संग्रामचा पहिला 'व्हॅलेंटाईन डे'
अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू तावडे गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. त्यांचा हा लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेंटाईन डे. दोघं हा प्रेमाचा दिवस साजरा तर करतीलच; पण त्याचबरोबरच यानिमित्त संग्रामने त्याच्या अनोख्या लव्हस्टोरीचा एक किस्सा सांगितला.
तो म्हणतो, ‘मी आणि खुशबूने एका मालिकेत काम केलं. या मालिकेच्या निर्मात्यांना खुशबूने एक ताकीद दिली होती. माझं लग्न या मालिकेत संग्रामशी झालं नाही तर मी मालिका सोडणार.
मालिकेच्या कथेमध्ये काही बदल झाल्यामुळे खरंच खुशबूने ती मालिका सोडली. त्याच क्षणी मी खऱ्या आयुष्यात खुशबूशीच लग्न करायचं ठरवलं.’ संग्राम ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘सूर राहू दे’मध्ये तर खुशबू ‘आम्ही दोघी’ मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय.