जवानांच्या हातांना पूरग्रस्त सांगलीच्या राख्या 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019

माता-भगिनींनी या देवदूतांना राख्या बांधून खरा रक्षाबंधन साजरा केला. भावुक झालेल्या जवानांनीही सांगलीकरांना धन्यवाद दिले.   

सांगली : घरात दहा-पंधरा फूट पाणी पाहून अनेकांचा थरकाप उडला. पाणी वाढतच होतं. मदतीसाठी सांगलीकरांनी दिलेली आर्त हाक ऐकून एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान सांगलीत देवदूतासारखे धावले. 

हजारो जणांना त्यांनी सुरक्षित बाहेर काढले. त्यांचा या धाडसाला तमाम सांगलीकरांनी सलाम केलाच... पण, माता-भगिनींनी या देवदूतांना राख्या बांधून खरा रक्षाबंधन साजरा केला. भावुक झालेल्या जवानांनीही सांगलीकरांना धन्यवाद दिले.   

महापुरानं सांगलीत हाहाकार उडवला. लोकांचे संसार पाण्यात गेले. झपाट्याने वाढणाऱ्या पाण्यामुळे अनेकजण पूरात अडकले. अपार्टमेंट किंवा दुमजली घरं असणारे तसेच अडकून होते. त्यांना तर सुरक्षितस्थळी नेलं पाहिजे, यासाठी एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान सांगलीत आले. सुमारे ५६९ जणांची फौज सांगलीत दाखल झाली. आणि लोकांसाठी जलद गतीने मदतकार्य सुरू केले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News