सांगलीत मोठी दूर्घटना;  बचावकार्यादरम्यान बोट उलटली, १४ जणांचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019

पुराच्या पाण्यात एक बोट उलटल्याची मोठी दूर्घटना सांगलीत घडली आहे. सांगलीमधील पलूस येथे हा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या बोटमध्ये २५ ते ३० जण प्रवास करत होते त्यातील 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सांगली : पुराच्या पाण्यात एक बोट उलटल्याची मोठी दूर्घटना सांगलीत घडली आहे. सांगलीमधील पलूस येथे हा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या बोटमध्ये २५ ते ३० जण प्रवास करत होते त्यातील 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सांगलीतील चार तालुक्यांना पुराचा वेढा आहे. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पाणी शिरलं होतं. पुरात अडकलेल्या 30 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून बोट पाठवण्यात आली होती. या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. बोटीची क्षमता 17 जणांची असताना या बोटीत 30 जण बसले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोटीचा पंखा झाडाझुडपात अडकला आणि बोट उलटली. त्यामुळे पूरग्रस्त नागरिक पुराच्या पाण्यात पडले. पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे त्यात 14 जणांचा बुडून मृत्यू झाला, तर 16 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता पूरग्रस्तांचा शोध सुरु आहे.

बचावकार्यासाठी एनडीआरएफ आणि नौदलाच्या तुकड्या

गेल्या अनेक दिवसांपासून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे सांगली आणि कोल्हापुरला अक्षरश: पाण्याने वेढलं आहे. सर्वच रस्ते, वस्त्या, गावे पाण्यात केल्याचं चित्र दिसत आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफ आणि नौदलाच्या तुकड्या सर्व जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. पूराच्या पाण्यात अडकेल्या नागरिकांना बोटींच्या सहाय्याने सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News