पूरग्रस्तांसाठी 5 कोटी खर्च करणार,रयतेच्या सेवेचा संकल्प - संभाजीराजेंचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Monday, 12 August 2019
  • संभाजीराजेंनी आर्थिक मदतीची घोषणा
  • पूरग्रस्त भागात 5 कोटी रुपये खर्च करणार 

कोल्हापूर  : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पूरग्रस्त भागात 5 कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प केला आहे. संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली. पुराने वेढलेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला राज्यभरातून मदत होत आहे. राज्य सरकारसह अनेक संस्था, संघटना, वैयक्तिक पातळीवरील अनेक गट मदत करत आहेत.

“माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाजसेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे”,  असं संभाजीराजे म्हणाले.

 

 

संभाजीराजेंनी आर्थिक मदतीची घोषणा करताना, मदतीवेळी माझा फोटो लावू नका, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. “कोल्हापूर-सांगली पूरग्रस्त लोकांना मदतीच्या वस्तूंवर माझा फोटो लावू नका! जे काही द्यायचं आहे ते निस्वार्थ भावनेनं द्या!” असं संभाजीराजे म्हणाले.

 

महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आहे. हजारो घरं पूर्ण बुडाली आहेत. त्यामुळे लाखो लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. असंख्य हेक्टर शेती पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातून सर्व काही निसटलं आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना पुन्हा उभारी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News