शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं; पाहा कोण म्हणतंय असं ?

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Friday, 2 August 2019

पवारांचे राजकीय उपद्रव मूल्य कमी झाल्यानं भाजपच्या मेगाभरतीत राष्ट्रवादीतून सर्वाधिक भरती होत आहे, असे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी म्हटले आहे.

लातूर :शरद पवारांमुळे काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेसचे नुकसान झाले. जे पेरलं तेच उगवणारना असं म्हणत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पवारांवर चांगलीच आगपाखड केली. पुढे बोलताना शिवाजीराव पाटील निलंगेकर म्हणतात, की शरद पवार हे स्वत: फोडाफोडी करून मुख्यमंत्री झाले होते. सत्तेसाठी ज्यांनी चारवेळा पक्षांतर केले आज त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना सोडले तर काय चुक केली ? त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये फूट पाडली. दुसरी काँग्रेस स्थापन केली तसेच पुलोदचा प्रयोग केला. अशा पवारांना आता पक्षांतरावर बोलायचा काय अधिकार? असा सवालही शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला आहे.

माझं मुख्यमंत्रीपद घालवण्यातही शरद पवारांचाच हात

 पवारांनी आपल्या राजकीय वाटचालीत अनेकांना धोबीपछाड दिली. कित्येक सहकाऱ्यांचे पराभव घडवून आणले. विलासराव देशमुखांना शरद पवारांनी पराभूत केलं.आपलं मुख्यमंत्रीपद घालवण्यातही शरद पवारांचाच हात आहे, असेही शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी मुलींचे गुण वाढवल्याचा आरोप शिवाजीराव पाटील निलंगेकरांवर झाला होता. याच आरोपानंतर शिवाजीराव पाटील यांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News